Info-tech news | फोनपेक्षाही स्वस्त किंमतीत जिओचा नवा लॅपटॉप

0
31

Info-tech news |   रिलायन्स जिओ कंपनी एक नवीन लॅपटॉप बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता लॅपटॉप इंडस्ट्रीमध्ये मोठी उलथापालथ होऊ शकते. जिओ एक खास लॅपटॉप लाँच करीत आहे. ज्याला जिओ क्लाउड लॅपटॉप असे नाव दिलेलं आहे.

ही अशी टेक्नॉलॉजी आहे की, ज्यामुळे महागडे लॅपटॉप स्वस्त किंमतीत बनवता येतील. रिपोर्टनुसार, जिओ क्लाउड हे  लॅपटॉप फक्त १५,००० रुपये इतक्या किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. असाही दावा केला जात आहे की, जिओच्या ह्या १५ हजार रुपयांच्या लॅपटॉपमध्ये ५० हजारांच्या लॅपटॉपचे फायदे मिळणार आहेत.

क्लाउड लॅपटॉप म्हणजे नेमकं काय

लॅपटॉप बनवण्यासाठी अनेक प्रकारचे हार्डवेयर आवश्यक असतात. ह्या हार्डवेयरमध्ये चिपसेट, स्टोरेज व अन्य पार्ट्सचाही समावेश असतो. पण, क्लाउड या टेक्नॉलॉजीत वर्चु्अली स्टोरेज व अन्य फीचर्सचा सपोर्ट दिला जातो. त्यामुळे डिव्हाइस बनवण्यासाठीचा खर्च कमी होतो. ह्या टेक्नॉलॉजीमध्ये रिमोटली फीचर्स अ‍ॅक्सेसही करता येतात, फक्त त्यासाठी इंटरनेटची आवश्यकता आहे.

थोडक्यात प्रोसेसिंगसाठी लागणारी पावर ही क्लाऊडमध्ये असेल व लॅपटॉप फक्त ती पावर अ‍ॅक्सेस करण्याचे माध्यम असणार आहे. त्याचबरोबर हा लॅपटॉप सब्सक्रिप्शन मॉडेलसोबत येतो. ह्या मॉडेलमध्ये ग्राहकांना लॅपटॉप वापरण्यासाठी दरमहा किंवा दरवर्षी एक ठराविक रक्कम द्यावी लागणार आहे.

Breaking news | मराठवाडा-नाशिक पाणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिला महत्त्वाचा निकाल

 लाँच कधी होणार

जिओचा हा लॅपटॉप कधी लाँच केला जाईल, याबाबत सध्या कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. पण, काही रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की, हा लॅपटॉप २०२४ पर्यंत लाँच केला जाणार आहे. ईटीच्या रिपोर्टनुसार, जिओ क्लाउड हा लॅपटॉप बनवण्यासाठी रिलायन्स जिओ कंपनीने एचपी, लेनोवो व एसर यासारख्या लॅपटॉप बनवणाऱ्या कंपन्यांशी संपर्क केला आहे. या कंपनीनं आपल्या अ‍ॅन्युअल जनरल मिटिंगमध्ये या लॅपटॉपची माहिती दिली होती.

क्लाऊड टेक्नॉलॉजीचा काय फायदा?

जिओ क्लाउड ह्या लॅपटॉपमध्ये हाय ग्रॉफिक्स असलेले गेम्स खेळता येणार आहेत. त्याबरोबरच हाय स्टोरेज असलेली कामेही करता येणार आहेत. तसेच ह्या लॅपटॉपमध्ये तुम्हाला गेम खेळण्यासाठीही अतिरिक्त स्टोरेजची आवश्यकता नाही.

Onion Rate | लासलगावात लाल कांद्याच्या दरात मोठी वाढ; असे आहेत दर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here