Maratha Reservation | राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला वारंवार आव्हान देत आहेत. येत्या १७ नोव्हेबंरला ते जालना जिल्ह्यातील अंबड येथे मेळावा घेणार आहे. त्याबाबत भुजबळ यांना त्यांच्याच जिल्ह्यात येऊन उत्तर देण्याची तयारी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांनी दुसऱ्या टप्प्यात उपोषण केल्यावर राज्य सरकारने चाळीस दिवसांची मुदत ही वाढवून घेतली आहे. त्यासाठी थेट निवृत्त न्यायाधीशांनी राज्य शासनाच्यावतीने प्रतिनिधीत्व केलेले होते.
Government Scheme | सरकारची महिलांसाठी खास योजना
दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा राज्य दौरा सुरू केला आहे. येत्या २२ नोव्हेंबरला सकल मराठा समाजाच्या वतीने सिन्नर, नाशिक व इगतपुरी तालुक्याच्या सीमेवर शेणीत येथे मनोज जरांगे यांचा जाहीर मेळावा होणार आहे. या मेळाव्याची जय्यत तयारीदेखील सुरू आहे. सर्वपक्षीय नेते या मेळाव्यासाठी एकत्र येणार आहेत. या मेळाव्यासाठी शेत नांगरून मोठे मैदान तयार करण्यात येत आहे. तरुण कार्यकर्त्यांमध्ये यासाठी अतिशय उत्साहाचे वातावरण आहे.
या सभेसाठी सर्वपक्षीय नेते उपस्थित राहणार आहेत. या सर्वपक्षीय नेत्यांचे लक्ष्य हे प्रामुख्याने मराठा आरक्षण तसेच जरांगे-पाटील हे असतील. मेळाव्यातील नेत्यांच्या भाषणाला आणि प्रामुख्याने मंत्री भुजबळ यांना त्यांच्याच नाशिक जिल्ह्यात येऊन जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे हा मेळावा आता प्रतिष्ठेचा बनणार आहे. असंख्य युवा कार्यकर्ते ह्या मेळाव्याच्या तयारीला लागले आहेत.
Crime news | दिवाळी साजरी कशी करायची; दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम