Maratha Reservation| जरांगे- पाटलांच्या घोषणेने सरकारची उडाली झोप..?

0
11

Maratha Reservation| मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज सरकारविरोधात आर किंवा पारच्या लढाईची घोषणा केली आहे. सरकारने २४ तारखेच्या आत आरक्षण दिलं नाही. तर २५ तारखेपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराच सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. तसेच २५ ऑक्टोबरपासून प्रत्येक गावागावात मराठा समाज साखळी उपोषण करणार आहे. प्रत्येक ठिकाणी अख्खं गावचं उपोषणाला बसणार आहे, जोपर्यंत आरक्षणाचा निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणत्याही पदावर असलेल्या राजकीय नेत्याला गावात प्रवेश दिला जाणार नाही, अशी घोषणाच मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

मनोज जरांगे यांनी अंतरवली सराटी येथे पत्रकार परिषद घेऊन आंदोलणाची घोषणा केली आहे. २४ तारखेच्या आत राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घेतला नाहीच. तर २५ तारखेपासून मी माझ्या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून मी पुन्हा आमरण उपोषणाला बसणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत आमच्या गावात कोणत्याही राजकीय नेत्याला येऊ देणार नाही. आरक्षण द्यायचं आणि मगच गावात यायचं. नाही तर गावाची वेसही शिवू देणार नाही. राजकीय पुढाऱ्यांना  म्हणजे आमदार, खासदार किंवा कुठल्याही मंत्र्यांना गावात प्रवेश मिळणार नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी ठणकावून सांगितलं आहे.

Beed voilence| बीडमध्ये महाराष्ट्राचा मणिपूर..? माणिपूरच्या ‘त्या’ घटनेचा रिमेक…

 प्रत्येक गावात साखळी उपोषण

२४ तारखेपासून सर्व गावांत साखळी उपोषण करण्यात येणार आहे. आणि आम्ही पूर्ण ताकदीने साखळी उपोषण करू. त्यानंतर २८ तारखेपासून त्याचं रुपांतर आमरण उपोषणात होईल. त्याची तयारी मराठा समाजाने केली आहे. सर्व गावांनी एक प्रमुख ठिकाणी बसून उपोषण करायचं आहे, असं यावेळी जरांगे पाटील यांनी सांगितलं.

कँडल मार्चही  काढु 

प्रत्येक तालुक्यात आणि  गावांत  मोठ्या संख्येने मराठा समाजाने एकत्र येऊन कँडल मार्च काढायचा आहे. हे आंदोलन शांततेचं असेल. पण, हे आंदोलन सुरू झाल्यावर ते सरकारला झेपणार नाही. त्यानंतर आता २५ तारखेला उपोषण सुरू झाल्यावर पुढच्या आंदोलनाची दिशा सांगू. दोन टप्प्यात हे आंदोलन करू. कारण आता त्याशिवाय सरकारला जाग येणार नाही, असा थेट इशाराच सरकारला त्यांनी यावेळी दिला आहे.

हे आंदोलन झेपणार नाही… 

आमरण उपोषण तसेच  साखळी उपोषण पूर्ण ताकदीने सुरू होणार आहे. सरकारला आमचं आंदोलन झेपणार नाही. २५ तारखेला २८ तारखेच्या आंदोलनाची दिशा सांगितली जाईल. पण, जी दिशा सांगितली जाईल. ती सरकारला पेलवणार नाही. आणि हे शांततेचंच युद्ध असेल.पण आमचं हे युद्ध तुम्हाला पेलवणार नाही. त्यामुळे याची दखल घ्या. २४ तारखेच्या आत आरक्षण द्या, अश्या शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे.

Weather Update| शेतकऱ्यांनो..! रहा निश्चिंत..चक्रीवादळामुळे राज्यात अवकळी पाऊस नाही…


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here