Nashik news | नाशकात जरांगेंची तोफ कडाडणार..! १०१ एकरांवर मराठ्यांची सभा

0
32
Jarange Breaking
Jarange Breaking

Nashik news | नाशिक जिल्ह्यातील सकल मराठा समाजातर्फे शेणित फाटा (ता. इगतपुरी) येथे १०१ एकर इतक्या क्षेत्रावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची बुधवारी (दि. २२) जाहीर सभा पार पडणार आहे. दरम्यान, या सभेचे नियोजन आता पूर्ण झालेले आहे.

इगतपुरी, सिन्नर, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या तालुक्यांसह संपूर्ण जिल्हा भरतून या सभेसाठी मोठ्या संख्येने मराठा बांधव येणार आहेत. दरम्यान, त्यांच्या येण्याच्या मार्गांवर विविध प्रकारच्या सोयी-सुविधाही उभारण्यात येणार आहेत.

शेणित फाटा येथील या नियोजित सभास्थळावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांचे छायाचित्र असलेला बलून रविवार (दि. १९) रोजी सोडण्यात आला होता. सभेच्या दृष्टीने आर्किटेक्टही प्लॅन करण्यात आलेला असून, ही नियोजनबद्धरित्या पार पडणार आहे.

Mumbai | ED पासून वाचण्यासाठी सत्तेत गेले भुजबळ; अंजली दमानिया यांचे प्रत्युत्तर

जवळपास ३०० फुटी रॅम्प तसेच १० फूट उंचीचा स्टेज तयार करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची १० बाय १० फूट आणि ११ फूट उंच अशी मूर्ती आणि जरांगे-पाटील हे स्टेजवर असणार आहेत. अशा प्रकारचे हे नियोजन असणार आहे.

महिला विभाग, स्वच्छतागृहांची व्यवस्था, आरोग्य विभाग, पाणी, नाश्ता आणि स्टॉल याबाबतचे सर्व नकाशे तयार करण्यात आलेले असून, त्यानुसार सर्व कामेदेखील पूर्णत्वाकडे गेलेली आहेत.

Marathwada | जायकवाडीला पाणी सोडावे यासाठी आंदोलन; मा. मंत्री राजेश टोपेंना अटक


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here