Jarange Breaking | आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही; जरांगेंच्या दौऱ्याचं नियोजन कसं ?

0
32
Jarange Breaking
Jarange Breaking

Jarange Breaking | माराठा आरक्षणाचा मुद्दा आता लवकारच मुंबई गाजवणार असं चित्र दिसत असून मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारीला मनोज जरांगे मुंबईत आमरण उपोषण करणार असून यासाठी त्यांनी राज्यातील मराठा बांधवांना आवाहनही जरांगेंकडून बीडच्या इशारा सभेत करण्यात आलं आहे. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्याबद्दल आता एक मोठी अपडेट समोर आली असून छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे हे पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, मनोज जरांगे म्हणाले की, “सरकारनं आमची फसवणूक केली. सरकारला आता एक तासही देणार नाही. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही. सरकारला चाळीस दिवस दिले तरी सरकारने काही केलं नाही. आता मात्र समाजाला न्याय मिळावा म्हणून आता मुंबईला जावे लागणार असून आम्ही 20 जानेवारीला मुंबईला पायी निघू. जालन्यातील आंतरवाली  सराटीतून सकाळी 9 वाजता मुंबईच्या दिशेने निघणार आहोत. आंतरवाली सराटी ते मुंबई रूट कसा असणार यासाठी टीम नेमण्यात आल्या असताना दोन ते तीन टीम या सर्व मार्गाची पाहणी करण्यासाठी गेलेली आहे.

Corona Update | कोरोनाचा वाढता कहर; नवीन व्हॅरियंटने घेतला तिघांचा बळी

Jarange Breaking | दौऱ्याचं नियोजन कसं ?

मराठा आरक्षणासाठी संपुर्ण राज्यातील मराठा बांधव एकत्र येत असून आता जरांगें यांच्या बीड मधील इशारा सभेत केलेल्या आवाहनानंतर मोठ्या संख्येने लोक मुंबईत जातील असं चित्र दिसून येत आहे. तर या आंदोलकांची खाण्याची – राहण्याची कशी व्यवस्था असणार यावर देखील मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे. “राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था आम्ही घेऊन जात असलेल्या गाड्यांमध्ये करणार असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं आहे.

20 जानेवारी रोजी होणाऱ्या मनोज जरांगे यांच्या मुंबई दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांकडून काही ट्रॅक्टर चालकांना नोटीस देण्यात आलेल्या असताना यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “पोलिसांकडून नोटीस देण्यात आल्याने  मुंबईकडे येणाऱ्या लोकांची आणखी संख्या वाढताना दिसत आहेत असा ठाम विश्वास जरांगेंनी मांडला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here