Jalgaon News | जळगाव जिल्ह्यातील मंत्री गिरीश महाजन यांचा मतदार संघ असलेल्या जामनेर तालुक्यात हादरवणारी घटना घडली असून, संतप्त जमावाने पोलिस स्टेशनवर दगडफेक केल्याने १५ पोलीस जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत समोर आलेल्या माहितीनुसार ११ जून रोजी जामनेर तालुक्यात एका ६ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन नंतर तिची हत्या केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली होती. या ३५ वर्षीय आरोपीने चिमूरडीवर अत्याचार करून तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह गावाजवळील एका केळीच्या शेतात टाकून दिला.
ही घटना घडल्यानंतर तब्बल १० दिवस हा आरोपी फरार झाला होता. तर, जामनेर पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. बेपत्ता मुलीचा शोध घेतला असता तिचा मृतदेह गावाजवळील एका केळीच्या शेतात आढळून आला. चौकशी दरम्यान चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या केल्याचे स्पष्ट झाले. (Jalgaon News)
१० दिवसांनंतर या फरार आरोपीला पोलिसांनी अटक केली. मात्र, यानंतर गावातील संतप्त जमावाने आरोपीला जमावाच्या ताब्यात देण्याची मागणी केली आणि नराधम आरोपीला शिक्षा आम्हीच देणार असल्याचे म्हटले. पोलिसांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते ऐकायला तयार नव्हते. यावेळी संतप्त जमावाने जामनेर पोलीस स्टेशनवरच दगडफेक केली आणि या दगडफेकीत १५ पोलीस गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. (Jalgaon News)
Jalgaon | उष्णतेने घेतला मुक्या जीवांचा बळी; १०० मेंढ्यांचा मृत्यू
Jalgaon News | काय म्हणाले एकनाथ खडसे..?
दरम्यान, या प्रकरणी एकनाथ खडसे म्हणले की,”आरोपीला राजकीय संरक्षण असल्याच्या भावनेतून ही दगडफेक झाली असावी. मात्र, अशा प्रकारे दगडफेक करणं हे चुकीचंच आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
गिरीश महाजन यांचे आवाहन
तर, मतदार संघाचे आमदार आणि मंत्री गिरीश महाजन यांनी याबाबत ट्विटही केलं असून, “काल रात्री जामनेरमध्ये दिसून आलेला जनतेचा आक्रोश व संताप हा रास्त आहे. कोणत्याही नागरिकांचा संताप अनावर व्हावा असेच कुकृत्य हे या घटनेत संबंधित नराधमाने केले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मी देखील आपल्या इतकाच संतप्त व व्यथित असून, माझी आपणा सर्वांना विनंती आहे की, कृपया आपल्या भावनांना आवर घाला. (Jalgaon News)
कोणीही कायदा हातात घेऊ नका. तपास यंत्रणेला पोलिसांना त्यांचे काम करू द्या. दोषी व्यक्तीला कठोर शिक्षा व्हावी, यासाठी काटेकोर तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच संपूर्ण परिस्थितीवर मी स्वतः लक्ष ठेवून आहे आणि संकटग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्याच्या सूचनाही मी संबंधित प्रशासनाला दिलेल्या आहेत.
Jalgaon | राऊत म्हणे भाXXX; गुलाबराव पाटील म्हणाले तुम्ही महाभाXXX नाही का..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम