Indian women went to pakistan ऑनलाइन गेमिंग च्या नादामध्ये पाकिस्तानहुन भारतामध्ये आलेल्या सीमाच प्रकरण ताज असतानाच, फेसबुक वर झालेल्या प्रेमातून भारतातील महिला अंजु ही पाकिस्तानला गेल्याच्या घटनेने देशभरात खळबळ माजली आहे.एवढंच नाही तर निकाहाच्या आधी अंजूने इस्लाम स्वीकारला असून तिने नावही बदललं असून तिने स्वतःचं नाव आता फातिमा असं ठेवलं आहे.
पाकिस्तानी मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, धर्म बदलल्यानंतर अंजूने तिचं नाव फातिमा ठेवलंय. त्यानंतर तेथील जिल्हा न्यायालयामध्ये नसरुल्लाह आणि अंजू उर्फ फातिमाने निकाह देखील केला. मालकुंड विभागाचे डीआयजी नासिर महमूद दस्ती यांनी अंजू उर्फ फातिमा आणि नसरुल्लाह या दोघांनी लग्न केल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब देखील केला आहे.
राजस्थानच्या भिवडीमधली विवाहिता अंजू ही महिला थेट पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा येथे आपल्या फेसबुक वर मैत्री आणि प्रेम झालेल्या प्रियकराला भेटण्यासाठी गेली. तिच्या पतीला आणि मुलांना सोडून तिने पाकिस्तान गाठलं व त्यानंतर तिच्या पतीने हे धक्कादायक खुलासे केले आहेत.
भारतामध्ये राहणारी अंजू नावाची महिला आपल्या पती अरविंद आणि दोघा मुलांना सोडून पाकिस्तानामध्ये गेली आहे. आणि तिथे तिने इस्लाम धर्म कबूल करून तिचा फेसबुक मित्र असलेल्या नसरुल्लाह सोबत निकाह देखील केला आहे. खैबर पख्तनुख्वा येथे त्यांनी निकाह केला. यामुळे देशभरात एकच खळबळ माजली आहे.
https://thepointnow.in/bhondubaba-tortured-the-woman/
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान मधून सीमा नावाची महिला भारतामध्ये आली आहे. पबजी या गेमच्या माध्यमातून तिची सचिन मीना त्याच्यासोबत ओळख झाली आणि या ओळखीतून झालेल्या प्रेमाखातर ती पाकिस्तानातून भारतामध्ये आल्याचं सांगत आहे. तिची देखील एटीएस कडून कसून चौकशी करण्यात येत आहे. मात्र फेसबुक वर झालेल्या मैत्रीतून भारतातील महिला थेट पाकिस्तानमध्ये जाऊन तिने निकाह केल्याने संमिश्र प्रतिक्रिया समाज माध्यमांवर उमटत आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम