Bhondubaba tortured the woman : जादूटोण्यात गुरफटली अन शारीरिक छळात फसली


Bhondubaba tortured the woman अडीअडचणी दूर करण्याचे प्रलोभन दाखवून एका मांत्रिकाने एका विवाहितेवर ४ वर्ष वारंवार बलात्कार केला. हा गैरप्रकार उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

जारण मारण,करणी भूतबाधा, मंत्र शक्ती काळी जादू हे प्रकार आजही खेड्यापाड्यात आढळतात, इतकेच नव्हे तर मुंबईसारख्या महानगरात अनेक ठिकाणी या प्रकारावर लोक विश्वास ठेवत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. रेल्वे आणि लोकलमध्ये देखील या संदर्भातील जाहिराती सर्रासपणे लावलेल्या दिसून येतात, आणि त्या ठिकाणी असलेल्या फोन नंबर किंवा संपर्क साधून लोक आपल्या समस्या घेऊन या भोंदूबाबांकडे जातात. यात कधी आर्थिक हानी होते तर कधी शारीरिक अत्याचार होतात. अंधश्रद्धा आजही लोकांच्या मेंदूमध्ये इतक्या घट्टपणे बसल्या आहेत की, तिथे विवेक आपोआप गहाण पडतो. याचेच एक उदाहरण ठाण्यातील मीरा भाईंदर परिसरात उघडकीस आले आहे.

 

याबाबत पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, आपल्या मैत्रिणीच्या माध्यमातून विवाहीत महिलेची सुमारे ५ वर्षांपूर्वी ओळख झाली. तेव्हा मैत्रिणीने सांगितले की, ‘कथीतबाबा हा काळी जादू करत असून सर्व समस्या दूर करतो, माझ्या सर्व समस्या दूर होऊन माझी भरभराट झाली आहे, त्यामुळे तुलाही तो मदत करेल. ‘ खरे म्हणजे घरगुती अडचणीमुळे ही महिला आधीच त्रस्त झाली होती, त्यातच पीडित विवाहितेचे पतीशी पटत नव्हते, तसेच तिचा लग्नाआधीचा प्रियकरही तिला त्रास देत असे. त्यामुळे मैत्रिणीच्या सांगण्याप्रमाणे तिने मांत्रिक मुकेश दर्जी (वय ४५) याच्याशी संपर्क साधला.

https://thepointnow.in/abolition-of-religious-v-s-superstitions/

जादूच्या साह्याने साऱ्या समस्या दूर करेल; मात्र त्यासाठी तुला माझ्याशी शारीरिक संबंध ठेवावे लागतील, असे दर्जीने सांगितले. आणि इथेच ही महिला त्या प्रकाराला बळी पडली. त्यानंतर तो भोंदूबाबा गेली चार वर्षे काळ्या जादूच्या नावाखाली त्या महिलेवर लैंगिक अत्याचार करत होता. अखेर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच पोलिसांनी आरोपी मांत्रिकावर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!