द पॉईंट नाऊ: फेसबुक इंस्टाग्रामने शेवटी समस्येची शहानिशा करून प्लॅटफॉर्ममधील असलेल्या बग ओळखल्याबद्दल जयपूर येथील विद्यार्थ्याला बक्षीस दिले.
जयपूर येथील नीरज शर्मा या विद्यार्थ्याला करोडो लोकांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक होण्यापासून वाचवल्याबद्दल इन्स्टाग्रामकडून ३८ लाख रुपयांचे बक्षीस मिळाले आहे.
माहितीनुसार, शर्मा यांना इंस्टाग्राममध्ये एक बग (समस्या) आढळला ज्यामुळे लॉगिन आणि पासवर्डशिवाय कोणत्याही वापरकर्त्याच्या खात्यात थंबनेल बदलता येऊ शकतात. हे त्याच्या लक्षात येताच शर्मा यांनी इन्स्टाग्राम आणि फेसबुकला या चुकीची माहिती दिली आणि ती खरी असल्याचे समजल्यानंतर त्यांना या कामासाठी ३८ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
यावेळी बग विषयी माहिती देताना नीरज शर्मा म्हणाला, “फेसबुकच्या इन्स्टाग्राममध्ये एक बग होता, ज्याद्वारे कोणत्याही खात्यातून इंस्टाग्राम किंवा फेसबुक रीलचे थंबनेल म्हणजेच लघुप्रतिमा कोणालाही बदलता येत होती त्याकरिता हॅकर्स ना खातेधारकाचा पासवर्ड कितीही मजबूत असला तरीही थंबनेल बदलण्यासाठी फक्त खात्याचा मीडिया आयडीची आवश्यक होती.
नीरज शर्मा यांच्याकडून ही समस्या कळताच इंस्टाग्राम फेसबुक टीम कडून या समस्येचे निरसन करून सुधारणा करण्यात आली.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम