Nashik News | इंडियन ऑईल इंधन प्रकल्पातील सुरक्षा अधिकाऱ्याच्या मनमानी कारभाराविरुद्ध इंधन वाहतूकदार मालक-चालक-वाहकांनी संप पुकारला आहे. संबंधित अधिकाऱ्याची येथून तातडीने बदली करण्याची मागणी वाहतूकदारांकडून करण्यात येत आहे.
इंडियन ऑइल प्रकल्पातील सुरक्षा अधिकारी कुलारी यांनी टँकरवर असलेल्या वाहकाला अरेरावी भाषेत शिवीगाळ करून कामावरून काढून टाकले होते. दरम्यान, सदर कामगार हा गरीब आणि होतकरू असून, त्याने रीतसरच गेटवरून सर्व प्रकारची कायदेशीर पूर्तता करूनच टँकर भरण्यासाठी आत प्रवेश केला होता.
रविवार कारंजासह चौकात CCTV चा असणार वॉच; प्रभाग तेरासाठी शासनाकडून एक कोटीचा निधी
परंतु, संबंधित सुरक्षा अधिकारी कुलारी यांनी कुठलीही विचारपूस न करता त्यास अरेरावी करीत त्याचा गेटपास जमा करून घेतला तसेच त्याला कामावरून काढून टाकले.
‘यापुढे कंपनीत येऊ नको आणि तुझ्याबरोबर असलेल्यांनाही एकेकाला मी बाहेर काढून टाकेन’ अशी धमकीही यावेळी दिल्याचे सांगण्यात आले आहे.
यावरून संतापलेल्या टँकर मालक,चालक आणि वाहकांनी या सुरक्षा अधिकाऱ्याच्या विरोधात संप पुकारत टँकर न भरण्याचा निर्णय घेतला आहे. या घटनेमुळे राज्यातील विविध ठिकाणी केला जाणारा इंधनपुरवठा ठप्प झाला आहे.
Nashik News | नाशिकमध्ये रिपाई तर्फे मराठा आरक्षणाला जाहीर पाठिंबा…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम