नाशिक | दागिने म्हटलं की सोनं! हा एकेकाळचा समज आता मागे पडत चाललेला असून नाशिककर आता हिऱ्यांकडे वळू लागल्याचं चित्र पहायला मिळत आहे. शहरातील हिऱ्यांच्या बाजारपेठेला गेल्या काही वर्षांपासून एक नविन झळाळी येत असून तरुणाईसह उच्च मध्यमवर्गीयांकडून हिऱ्यांच्या दागिने खरेदीला पसंती लाभत आहे.
Malegaon | अद्वय हिरे यांना 20 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
नाशिक शहरात काही वर्षांपूर्वी हिऱ्यांविषयी फार जागृती नव्हती. त्यामुळे लोक सोने-चांदी खरेदीलाच प्राधान्य देत होते. गुंतवणुकीसाठीदेखील त्यांचाच विचार केला जात असे. पण शहरात नामवंत ब्रॅण्ड्सचे शोरूम दाखल झाल्यानंतर हिऱ्यांचे व्यवहार वाढलेले आहेत. सध्या नाशिकमध्ये चार हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतचे हिरे उपलब्ध आहेत. नाशिक शहरातील बहुतांश हिरे सुरत आणि मुंबईतून येतात. ग्राहकांच्या मागणीमुळे आता शहरातील बहुतांश सराफी पेढ्यांवर हिऱ्यांचे दागिने उपलब्ध करून दिले जातात.
‘कट’, ‘क्लिऍरिटी’, ‘कलर’ आणि ‘कॅरेट’ या चार ‘C’च्या निकषांनी हिऱ्याची पारख केली जाते आणि किंमत ठरवली जाते. जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिका (GAI) यासारख्या मोजक्या संस्थांकडून हिऱ्याची पारख होते. दागिन्यात हिरा घट्ट बसावा, यासाठी जरा कठीण सोने आवश्यक असते. त्यामुळे हिऱ्यांसाठीचे दागिने शक्यतो 18 कॅरेट सोन्यामध्ये घडवले जातात. मागील काही काळापासून रोझ गोल्ड आणि प्लॅटिनममध्येही हिऱ्याचे दागिने साकारले जात आहेत असे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
Viral News | तरुणांचा प्रताप; स्कॉर्पिओचा सुसाट वेग अन् टपावर फटाक्यांची आतिषबाजी
कोणत्या दागिन्यांना सर्वाधिक मागणी…
हिऱ्यांच्या दागिन्यांपैकी सध्या सर्वाधिक मागणी महिलांच्या अंगठ्यांना (लेडीज रिंग) आहे. त्या खालोखाल मुरणी, नेकलेस, कानातले, पेंडंट सेट यांची खरेदी केली जाते आहे. तरुणाईमध्ये हिऱ्याच्या दागिन्यांची क्रेझ वाढली असून बजेटमध्ये बसणारे दागिने खरेदी केले जाते आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम