ठाकरेंच्या चिथावणीच्या वक्तव्यावर, इम्तियाज जलीलाची टिका

0
8

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नवीन भूमिकेवर राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे भोंग्यावर ठाम राहत राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. राज ठाकरेंच्या या चिथावणीच्या वक्तव्यावर मुस्लमी समाज सावध इशारा दिला आहे. औरंगाबाद एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आपली  भूमिका  स्पष्ट केली.

इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत मनसेच्या भूमिकेवर हल्ला चढविला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंग्यांसंदर्भात दिलेला अल्टीमेटम हा मुस्लिम समाजाला नाही तर महाराष्ट्र सरकारला दिला आहे. त्यामुळे राज्याचं गृहखातं हाती असलेल्या दिलीप वळसे पाटलांच्या भूमिकेकडे आमचं लक्ष असेल’, असं एमआयएम खासदार इम्तियाज जलील म्हणाले. राज ठाकरे यांचे ऐकल्यानंतर सियासत कि दुकानो मे जरूरी है मुल्क मेरा जलता है, असे मला वाटले असेही इम्तियाज जलील म्हणाले.

इम्तियाज जलीलानी राज ठाकरेंना टोला देखील लगावला, राज जे बोलत होते ती महाराष्ट्राची संस्कृती कधीच नव्हती, राज ठाकरेंनी ४ मेला जो अल्टीमेट दिला आहे. मशिदीवरील भोंगे उतरले नाही तर त्यांच्यासमोर आपण हनुमान चालिसा लावणार. तुम्ही ते लावणार आणि तुमच्यावर गुन्हा दाखल करुन घेणार मात्र ते स्वत अयोध्येला जाणार,आज युवा पिढी त्रस्त आहे. शिक्षण, आरोग्य, महागाई असे महत्त्वाचे विषय असताना राज ठाकरे समाजाला भरकटवत आहेत’, अशी मिश्किल टीकाही त्यांनी केली आहे.

 

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here