Gold Silver Rate| सोने-चांदीच्या दरांत ऑक्टोबर महिन्यात मोठी तफावत होती. महिन्याच्या सुरुवातीला घसरणीचे सत्र सुरु होते. त्याला ७ ऑक्टोबरनंतर मोठा ब्रेक लागला होता. आता ह्या आठवड्याची सुरुवातच सोन्याने नरमाईने केलीय. बघूयात काय आहेत सोने-चांदीचे दर …
ऑक्टोबर महिन्यात सोने-चांदीला चकाकी आली. किंमतींनी चांगलीच मुसंडी घेतली. त्यामुळे दसऱ्यात सोने-चांदी खरेदीच्या ग्राहकांच्या पदरी निराशा आली. जागतिक स्तरावर दोन युद्ध सुरु आहेत. युरोप आणि अमेरिकेत मंदी सुरु आहे. शेजारील चीनही थंडावले आहे. त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला ब्रेक लागला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी सोने-चांदीची मागणी वाढवली आहे. त्याचे चिन्हे भारतीय सराफ बाजारातही दिसून आली. या आठवड्याच्या सुरुवातीला व ह्या महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सोने स्वस्त झाले आणि चांदी महागली आहे. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये सोने-चांदीची काय चाल असेल याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.(Gold Silver Rate)
सोन्याची माघार…
गुडरिटर्न्सनुसार, मागील आठवड्याची सुरुवातही घसरणीने झाली होती. २३ ऑक्टोबरला ३०० रुपयांनी सोनं स्वस्त झाले होते. २८ ऑक्टोबरला ६०० रुपयांनी वाढल्यानमुळे सोने एक हजारांनी वर सरसावले होते. ३० ऑक्टोबर रोजी सोनं २३० रुपयांनी खाली आल आहे. आता २२ कॅरेट सोने ५७,३५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचा दर हा ६२,५५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चांदी सरसावली…
गेल्या आठवड्यात चांदीत मंदी होती. किंमतीत घसरण सुरु होती. मागील आठवड्यात चांदीत १२०० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे महिन्याच्या शेवटीही चांदीत घसरणीचाच अंदाज होता. पण तो तंतोतंत चुकला आणि चांदीने १ हजारांनी वर सरसावली. ३० ऑक्टोबर रोजी ही दर वाढ झाली आहे. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ७५,६०० रुपये इतका आहे.
कॅरेटचा दर काय
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोने ६१,२३८ रुपये तर, २३ कॅरेट ६०,९९३ रुपये आहे. २२ कॅरेट सोने हे ५६,०९४ रुपये झाले आहेत. तर, १८ कॅरेट सोने हे ४५,९२८ रुपये इतके आहे , १४ कॅरेट सोने ३५,८२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले असून, चांदीच्या दरांत वाढ झाली आहे. एक किलो चांदीचे दर हे ७१,९३१ रुपये आहे. तज्ज्ञांच्या मते, इस्त्राईल-हमाय युद्ध तसेच दिवाळीत मागणी वाढल्यानमुळे सोने आणि चांदीत मोठी घसरण होणार नाही.(Gold Silver Rate)
Horoscope 31 October: आज या 4 राशीच्या लोकांच्या आयुष्यात घडेल हे , आर्थिक लाभासाठी करा हे खास उपाय
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम