आसनी चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात; आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज

0
1

सलग तीन वर्षे येणार वादळ यावर्षी देखील येणार आहे. त्याला आसनी नाव देण्यात आलं. चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे.आसनी हे वादळ येत्या 6 तासांत त्याचे गंभीर परिणाम दाखविणार आहे. आसनी चक्रीवादळ उत्तर-ईशान्येकडे आणि ओडिशाच्या किनारपट्टीपासून बंगालच्या उपसागरात आहे. उत्तर-पश्चिम दिशेने सरकण्याची शक्यता आहे.

आसनी चक्रीवादळ सध्याची हे विशाखापट्टणमपासून 940 किमी आणि ओडिशातील पुरीपासून 1000 किमी अंतरावर असल्याची माहिती मिळाली आहे. असनी चक्रीवादळ हे 10 मे रोजी पश्चिम बंगालमध्ये येण्याची शक्यता. आसनी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल, ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अलर्ट जारी केले आहे. गेल्या 6 तासात हे वादळ 14 किमी प्रतितास वेगाने वायव्य दिशेकडे सरकत आहे. त्याचे तीव्र चक्री वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे.

आसानी चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगालच्या किनारपट्टी परिसरात बचाव तयारी सुरू करण्यात आली आहे. एनडीआरएफ, एसडीआरएफ, कोस्टल गार्ड आणि नेव्ही अलर्टवर आहेत. जिल्ह्यांच्या प्रत्येक भागात तसेच मुख्यालयात नियंत्रण कक्ष सुरू करण्यात येत आहेत. यासोबतच 5 आपत्कालीन प्रतिसाद पथके सज्ज आहेत. वादळाच्या काळात लोकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here