महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले आहेत. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ ते १९ मार्च २०२४ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ मार्च ते २६ मार्च २०२४ दरम्यान होणर आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकरच परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
Crime news | RPF जवानाकडून १७ वर्षीय तरूणीवर बलात्कार…
फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेची लेखी परीक्षा कोणत्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहेत, याची माहिती महाराष्ट्र शिक्षण मंडळाने दिलेली आहे.
‘मंडळाच्या संकेतस्थळावरील वेळापत्रकाची सुविधा ही फक्त माहितीसाठी आहे. परंतु परीक्षेपूर्वी सर्व माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे, असे शिक्षण मंडळाने जाहीर केलेले आहे.
Education News | दहावी-बारावीइतकेच आता नववीलाही महत्त्व!
इयत्ता १० वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दिनांक १० फेब्रुवारी २०२४ ते गुरूवार दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ तर इयत्ता १२ वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दिनांक २ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दिनांक २० फेब्रुवारी २०२४ या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम