Horoscope 22 April 2024 | ग्रहांमुळे आज ‘या’ राशींना फायदा; वाचा आजचे राशीभविष्य

0
32
Horoscope 9 May 2024
Horoscope 9 May 2024

Horoscope 22 April 2024 |  पंचांगानुसार आज 22 एप्रिल 2024 सोमवारचा दिवस हा महत्त्वाचा आहे. आज ग्रहांमुळे वाशी योग, आनंदादि योग, सुनाफ योग, आणि हर्ष योग यांचे काही राशींना सहकार्य लाभेल. आज शुभ कोणतेही कार्य करायचे असल्यास त्यासाठी सकाळी 10:15 ते 11:15 आणि दुपारी 04:00 ते 06:00  हे दोन शुभ मुहूर्त आहेत. तर, सकाळी 07:30 ते 09:00 पर्यंत राहुकाळ असेल. आजचा दिवस हा सर्व राशींसाठी कसा असेल..? हे जाणून घेऊयात. वाचा आजचे राशीभविष्य –

मेष राशी –

व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा अत्यंत शुभ आहे. त्यांनी आज प्रामाणिक प्रयत्न केले तर, नक्कीच यश मिळेल.  आज तुम्हाला तुमचा अडकलेला पैसा मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. नोकरदार वर्गाच्या लोकांनी कामाचे दस्तावेज सुरक्षित ठेवा. बॉससोबत चांगले संबंध ठेवा आणि त्यांचा सल्ला घ्या. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल. तरूणांसाठी आजचा दिवस सामान्य असेल. तुमची सर्व कामे सहज पूर्ण होतील. तुम्ही व्यायाम करणे गरजेचे आहे.अन्यथा लठ्ठपणा व आजार दोन्ही उद्भवू शकतात.(Horoscope 22 April 2024)

वृषभ राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांनी आपल्या वरिष्ठांकडून मार्गदर्शन घ्यावे. व्यावसायिकांनी आज थोडे सावध असावे. विनाकारण सामानाची खरेदी करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. व्यावसायिक आज जर काही मोठे व्यवहार करणार असतील. तर, यात कोणाला तरी मध्यस्थी ठेवणे तुमच्यासाठी चांगले राहील. आज तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुम्ही कोणतेही औषध घेताना ते डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे. अन्यथा संसर्ग होऊ शकतो.

Horoscope 22 April 2024 | मिथुन राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांनी कामाच्या ठिकाणी अधिक सक्रिय राहावे. आज तुमची अपडेट राहणे गरजेचे आहे. ग्रहणाच्या संयोगामुळे आज नोकरी करणाऱ्या लोकांना खूप सावध राहावे लागेल. अन्यथा ते मोठ्या संकटात सापडू शकतात. व्यावसायिकांना आज काहीअंशी तोटा सहन करावा लागू शकतो. कामाच्या तणावामुळे आज तुमच्या वैवाहिक जीवनातही तणाव असेल.(Horoscope 22 April 2024)

यासाठी डोकं शांत ठेऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न करा. अन्यथा गोष्टी आणखी बिघडू शकतात. आज तुम्हाला तुमच्या मुलांच्या आरोग्याबाबत सावध राहावे लागेल. त्यांची तब्येत बिघडू शकते. तरुण वर्ग जर आज आपलया प्रेम संबंधांबाबत काही निर्णय घेण्याचा विचार करत असतील. तर, थांबा आजचा दिवस योग्य नाही. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, आज तुम्हाला तोंड आणि दातांशी संबंधित समस्या जाणवू शकतात.

Horoscope 19 April 2024 | आज कोणतेही काम करताना काळजी घ्या; वाचा आजचे राशीभविष्य

कर्क राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांना आज काम वेळेवर पूर्ण करण्यावर भर द्यावा लागेल. हर्ष योगामुळे काही व्यावसायिकांच्या व्यवसायात आज अपेक्षित सुधारणा होतील. व्यवसायातील भागीदाराच्या मदतीने अनेक समस्या सोडवण्यात तुम्हाला यश येईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेल घालवू शकतात. यामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबियांचे प्रेम मिळेल आणि प्रेम वाढेल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, घरी व्यायाम करणाऱ्यांनी काळजी घ्या, अन्यथा त्यामुळे नसांवर ताण येऊ शकतो.(Horoscope 22 April 2024)

सिंह राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांना आज कामावर लक्ष केंद्रित करावे. अशांत मनाने काम केल्याने तुमच्या कामात चुका होऊ शकतात. व्यावसायिकांना आज त्यांच्या भूतकाळातील अनुभव त्याला उपयोगी पडेल. तरुणांची आज कुटुंब आणि मित्रमंडळींच्या मदतीने वाईट गोष्टींपासून सुटका होईल. आरोग्याविषयी बोलायचे झाले तर, कौटुंबिक वाद आणि अशांततेमुळे नोकरदार महिलांना आरोग्याच्या आणि मानसिक समस्या येऊ शकतात. जे लोक काही जुन्या आजाराने त्रस्त आहेत. त्यांनी वेळेवर औषध घ्यावे. अन्यथा आज जून आजार उद्भवू शकतात.

कन्या राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांना आज तुमच्या बॉसचा महत्त्वाचा सल्ला खूप उपयोगी पडेल.  हर्ष योगामुळे नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिक आज व्यवसायासाठी नवीन योजना तयार करू शकतात. व्यवसायातील भागीदाराची यात तुम्हाला मदत होईल. आजचा दिवस तुमच्या पालकांसाठी त्रासदायक असू शकतो. त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे त्यांची हाडे दुखू शकतात.

तूळ राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांचा आज कामाचा ताण वाढेल. त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आज ग्रह अनुकूल नसल्याने छोट्या चुकांसाठीही तुम्हाला बॉसचे बोलणे ऐकावे लागतील. त्यामुळे काम करताना सतर्क राहा. ग्रहण दोषामुळे व्यावसायिकांना आज कामे पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागेल. अगदी साध्या कामांनाही आज जास्त वेळ लागेल. व्यवसायात होणाऱ्या नुकसानीमुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.  आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसोबत सत्संग करा किंवा हनुमान चालीसाचा पाठ करा. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, आज तुमची प्रकृती सामान्य राहील. (Horoscope 22 April 2024)

वृश्चिक राशी –

हर्ष योगामुळे नोकरदार वर्गाच्या लोकांना आज कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळेल. तुमच्यावर मोठ्या जबाबदाऱ्याही येऊ शकतात. व्यावसायिकांनी आज भागीदारासोबत वाद टाळा. आज जर तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर, थोडे सावध रहा. तसेच वरिष्ठ आणि अनुभवी लोकांचा सल्ला घ्या. वैवाहिक जीवनात महिलांनी आज पर्यंत तुमच्या पतीला जशी साथ दिली आहे. ती भविष्यातही द्या. तुमच्या पाठिंब्यामुळे त्यांची प्रगती होईल. (Horoscope 22 April 2024)

Horoscope 17 April 2024 | ‘रामनवमी’चा दिवस कसा असेल; वाचा आजचे राशीभविष्य

धनु राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांचा आज कामाचा ताण कमी होईल. नोकरदार लोक त्यांच्या करिअरमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना या दिशेने वेगाने प्रयत्न करावे लागतील. तरुणांनी आज शक्य तितके वाद टाळावे. तसेच इतरांच्या बाबींमध्ये हस्तक्षेप करणे टाळा. नोकरदार महिलांनी आज शांत राहण्याचा प्रयत्न करा. आज घरात तुम्ही दुरुस्ती किंवा नवीन काम करण्याची योजना तयार करू शकतात. कोणतेही काम सुरू करण्याआधी घरातील मोठ्यांसोबत चर्चा करा. सध्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे हे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. (Horoscope 22 April 2024)

मकर राशी –

नोकरदार वर्गाचे लोक आज कामाच्या ठिकाणी सकारात्मक असतील. त्यामुळे आज तुमची अनेक कामे आपोआप पूर्ण होतील. तुमची बदली होण्याचीही शक्यता आहे. तुम्हाला काही नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनी आज थोडे सावध राहावे. नवीन व्यवहार करताना जरा विचारपूर्वक करा. अन्यथा नुकसान होऊ शकतात. व्यावसायिकांनी गुंतवणूक करण्याचा विचार करावा. घरातील देवघराची जागा स्वच्छ करा आणि कुटुंबासह गणेश स्तोत्र वचन करा. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, आज तुम्हाला डोळा आणि डोकेदुखीची समस्या जाणवू शकते.  (Horoscope 22 April 2024)

कुंभ राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांचे आज कामाच्या बाबतीत केलेले नियोजन अयशस्वी होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आजच्या दिवसाच्या शेवटी कामाचा ताण वाढेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस अडचणींचा असेल. विरोधक मजबूत असल्याने आज तुमचे नुकसान होऊ शकते. व्यवसायाशी संबंधित नवीन करार केले जाऊया शकतात. मात्र, सावधगिरी बाळगा. जर तुम्ही कुटुंबाच्या गरजा आणि मुलांच्या भविष्याची चिंता करत असाल. तर ते तुमच्या जोडीदारासोबत शेअर करा. यामुळे तुमच्या मनाला आराम मिळेल. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर, आज वाहन चालवताना काळजी घ्या. ग्रहांच्या स्थितीमुळे मोठी दुखापत होऊ शकते.(Horoscope 22 April 2024)

मीन राशी –

नोकरदार वर्गाच्या लोकांना आज त्यांच्या प्रयत्नांचे फळ मिळेल. ज्यामुळे तुमची आज प्रशंसा होईल. हर्ष योग तयार झाल्यामुळे भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. तुमच्या जोडीदारासोबत बोलताना आज तुम्ही तुमच्या बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवावे. कठोर शब्द वापरल्यामुळे तुमचे नाते बिघडू शकते आणि याचा तुम्हाला नंतर पश्चात्ताप करावा लागू शकतो. तुम्ही कामावरही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. आरोग्याविषयी बोलायचे झाले, तर जास्त तेलकट पदार्थांचे सेवन टाळणे तुमच्यासाठी हानिकारक ठरेल. यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. (Horoscope 22 April 2024)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here