द पॉईंट नाऊ ब्युरो : महाराष्ट्रात बंड केलेल्या शिवसेना आमदारांच्या सुरक्षा रक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बंडखोर आमदारांचे जे पोलीस सुरक्षा रक्षक आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई होण्याची शक्यता आहे.
राज्यातून हे सर्व आमदार गुजरातमध्ये गेले आणि ही बाब पोलिसांना कळूच नये. ही बाब गृह खात्याला खटकलेली असून, त्यावर ऍक्शन घेण्याच्या तयारीत गृहखाते असल्याचे बोलले जात आहे.
हे आमदार महाराष्ट्रातून दुसऱ्या राज्यात गेले. मात्र या सर्व आमदारांच्या पोलीस सुरक्षा रक्षकांनी याबाबत कोणतीही माहिती गृह खात्याला दिली नाही. यामुळे या सर्वच पोलीस सुरक्षा रक्षकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 40 हुन अधिक आमदार हे महाराष्ट्रातून आधी गुजरातमध्ये गेले. आणि नंतर तेथून आसाम मध्ये गेले. राज्याच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेमध्ये पडलेले दोन गट या भूकंपास कारणीभूत आहेत. निष्ठावान समजल्या जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी अचानक बंड केल्याने, राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर झाले आहे. आता पोलीस सुरक्षा रक्षकांवर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम