शिंदे गटाचा महाविकास आघाडीस दणका; उपसभापती नरहरी झिरवाळ यांना हटवण्याची तयारी सुरू?


द पॉईंट नाऊ ब्युरो : एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या गटाने, अर्थात शिंदे गटाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्या हकालपट्टीसाठी शिंदे गटाने एक ठराव मांडल्याचे सांगण्यात येत आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या 46 आमदारांच्या स्वाक्षरी घेऊन या प्रस्तावाची तयारीची कारवाई शिंदे गटाने केल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे हा महाविकास आघाडीसाठी एक मोठा झटका असणार आहे.

शिवसेनेत पडलेल्या दोन गटांनी महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. त्यात दोन्ही बाजूंनी एकमेकांना इशारे, प्रत्युत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे ही एक प्रकारची एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

शिंदे गटातील आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. यादरम्यान शिवसेनेने नव्याने नियुक्त केलेल्या गटनेतेपदाबाबत शिंदे गटाने आक्षेप घेतला होता. मात्र त्यास झिरवाळ यांनी नामंजूरी दर्शवली.

आता शिंदे गटातील आमदार मिळून नरहरी झिरवाळ यांनाच हटवण्याची तयार करत असल्याचे बोलले जात आहे. असे झाल्यास हा महाविकास आघाडी सरकारला मोठा झटका असणार आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Leave a Comment

Don`t copy text!