हिंदुत्व पेट घेत आहे ; काका संभाजीनगरात तर पुतण्या बालाजी चरणी लिन

0
41

राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना मनसेचे राज ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. तर दुसरीकडे आदित्य ठाकरे दक्षिण भारताच्या दौऱ्यावर गेले आहे. मुंबईत तिरुपती बालाजीचं मंदीर लवकरच उभारण्यात येणार आहे. मुंबईतील उलवे नोडया ठिकाणी व्यंकटेश्वराचे मंदीर उभारण्यासाठी तिरुमला तिरुपती देवस्थानास भाडयाने जमीन देण्याबाबतचे पत्र सुब्बा रेड्डी यांना दिले आहे. याकरिता आदित्य ठाकरे यांनी आज तिरुपती गाठले आहे. तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डी यांनी समाधान व्यक्त केले.

आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण आणि राहुल कनाल हे खासगी विमानाने आज तिरुपती येथे पोहचले. आज पहाटे आदित्य ठाकरे यांचे तिरुपती येथे प्रारंभी पद्मावती दर्शन केले आणि तिरुपती देवस्थानाचे अध्यक्ष सुब्बा रेड्डई पत्र सुपूर्द केले आहे. त्यावेळी तिरुपती देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी, देवस्थानाचे सदस्य मिलिंद नार्वेकर, युवा सेनेचे राहुल कनाल, सूरज चव्हाण व देवस्थानाचे इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

तिरुपती देवस्थानाने विनंती केल्यावर सिडको तसेच राज्य शासनाने कमी कालावधीत याविषयीचा निर्णय घेऊन जमीन उपलब्ध करून दिले. त्यामुळे बालाजीच्या लाखो भाविकांची मोठी सोय झाली आहे. भाविकांना तिरुपती बालाजी ला जाणे शक्य होत नाही तसेच मुंबई तिरुपती बालाजीचे एखादं देवस्थान असावे असे अनेकदा मागण्या आल्या होत्या याकरिताच हा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. जमीन वाटपाचे पत्र देण्यासाठी मंत्री आदित्य ठाकरे तिरुपतीला आले याविषयीही देवस्थानचे अध्यक्ष्यांनी समाधान व्यक्त करून आभार मानले.

 


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here