राज ठाकरे कधी चैत्यभूमीवर गेले का? जितेंद्र आव्हाडांचा राज ठाकरे यांना प्रश्न

1
18

1 हे महाराष्ट्रात दिनानिमित्त संभाजीनगर येथील सभेत नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात बाबासाहेब पुरंदरे यांचा उल्लेख आला होता. इतिहास भूगोलावर निष्कारण बोलू नका. भोंग्या-पोंग्यावर काय बोलायचे ते बोला. यावर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड राज ठाकरे यांना टोला लगावला आहे.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, राज ठाकरे हे ब.मो. पुरंदरे यांची कादंबरी वाचत लहानाचे मोठे झाले. त्यामुळे ते असेच बोलणार, असे म्हणत राज ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी शोधून काढली. राज ठाकरे कधी चैत्यभूमीवर गेले आहेत का? इतिहासाशी खेळू नका माणूस त्यात अडकून जातो. पुरंदरेंचे तेच झाले. बहुजन समाजाची पिढी शिकल्यावर शिवाजी महाराजांच्या जीवनावर संशोधन झाले. त्यात पुरंदरे अडकले. इतिहास हा राजकीय पक्षाचा विषय नाही.

इतिहासकार गप्प बसतील तेव्हा देशाचे वाटोळे होईल. इतिहासाचे आकलन होत नाही तोपर्यंत विचार भरकटलेले असतात, चुकीचा इतिहास सांगून पोरांना नादवायची. अंधळ्या पोरांना चुकीच्या दिशेने नेल्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले. असा टोलाही त्यांनी राज ठाकरे यांना लगावला. शिवाजी महाराज यांनी स्वतः लिहिलेल्या दस्तावरच राजमुद्रा असायची. दुसरी कुठेही नाही. शिवाजी महाराजांची राजमुद्रा कुठेही वापरायची नसते. हा शिवद्रोह आहे, असा आक्षेप मंत्री आव्हाड यांनी मनसेच्या ध्वजा बाबत घेतला.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here