Har ghar tiranga केंद्र सरकारतर्फे यावर्षी देखील आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणारी हर घर तिरंगा मोहिमेची तयारी सुरू झाली आहे.
देशामध्ये सध्या आजादी का अमृत महोत्सव मागील वर्षापासून साजरा केला जात आहे. या अंतर्गत हर घर तिरंगा ही मोहीम हाती घेण्यात आली होती. याच अनुषंगाने या वर्षी देखील हर घर तिरंगा 2.0 अंतर्गत पोस्ट विभागातर्फे राष्ट्रध्वज पुरवण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्यक्ष अथवा ऑनलाईन नोंदणी करणे गरजेचे असून ज्यांना या मोहिमेत सहभागी व्हायचं आहे. त्यांनी ऑफलाइन किंवा ऑनलाईन नोंदणी करण्याच आवाहन नाशिक मंडळाचे प्रवर अधीक्षक डाकघर यांच्या वतीने शासकीय परिस्थिती पत्रकार द्वारे करण्यात आले आहे.(Har ghar tiranga)
टपाल विभागामार्फत 2023 च्या स्वातंत्र्य दिना निमित्ताने राष्ट्रध्वज खरेदी करून नागरिकांना हर घर तिरंगा मोहिमेत मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन होता येणार आहे. यासाठी टपाल विभागामध्ये 20 इंच बाय 30 इंच(20×30) आकाराचे राष्ट्रध्वज 25 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.(Har ghar tiranga)
मागील वर्षी नागरिकांचा हर घर तिरंगा या मोहिमेला लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता यावर्षी देखील राष्ट्रध्वजासाठी आगाऊ नोंदणी करून हे राष्ट्रध्वज मिळवता येणार आहेत. यासाठी प्रवर अधीक्षक डाकघर कार्यालय, प्रधान डाकघर कार्यालय, नाशिक रोड येथे याचबरोबर आपल्या जवळील टपाल कार्यालयांमध्ये 14 ऑगस्ट 2023 पर्यंत संपर्क करता येणार आहे.(Har ghar tiranga)
https://thepointnow.in/political-crisis-3/
मागील वर्षी या मोहिमेला नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला होता. यामध्ये जवळपास सर्वच घरांवर राष्ट्रध्वज फडकताना दिसून आला होता. आता वर्ष हे आझादीचा अमृत महोत्सव म्हणून साजरा केला जात असून यंदा देखील नागरिकांनी या मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा आवाहन केलं जात आहे.
अशी करा नोंदणी
राष्ट्रध्वज ऑनलाइन मागवण्यासाठी http://www.epostoffice.gov.in
या संकेतस्थळावर 12 ऑगस्ट 2023 पर्यंत नोंदणी करता येणार आहे. नोंदणी केल्यास राष्ट्रध्वज घरपोच मिळणार असून नागरिकांना या मोहिमेत सहभागी होता येणार असल्याचा प्रवर अधीक्षक डाकघर यांनी सांगितल आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम