Gunratna Sadavarte | गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ असून परखड तसेच रोखठोक मत मांडल्याने ते नेहमीच चर्चेत असतात. सध्या मराठा आरक्षण हा मुद्दा राज्यभर चांगलाच गाजतो आहे. यातच मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि मिळाले तर ते आरक्षण न्यायालयात टिकणार नसल्याचे वक्तव्य सदावर्ते यांनी केलं आहे. अशाच प्रकारे अनेक वक्तव्यांमुळे सदावर्ते नेहमीच चर्चेत असतात.
यातच नुकतेच स्पष्टवक्ते सदावर्ते यांनी एका नामांकीत वृत्तवाहीनीला मुलाखत दिली. यातच त्यांनी अनेक खुलासे देखील केले आणि यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या आजीच्या सौंदर्याची तुलना सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत केली आहे. माझा कट्ट्यावर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या आजीची आठवण सांगितली तसेच यावेळी त्यांनी त्यांच्या आजीच्या सौंदर्याचे खूप कौतुक केले.
Pune Crime | आधी लग्नाचे ‘प्रॉमिस’ आणि नंतर डांबून ठेवत मारहाण अन् अत्याचार
यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘माझी आजी इतकी सुंदर होती की तिच्यापुढे आताची अभिनेत्री रश्मिका मंदान्ना देखील फिकी असून माझ्या आजीपुढे रश्मिका मंदान्ना पाणी कम चायच असं म्हणावं लागेल. माझ्या आजीची उंची सहा फूट होती आणि माझी आजी रशियन मुलींप्रमाणे सुंदर दिसायची तसेच आजी खूप स्लिमही होती.’
ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी त्यांच्या संघर्षाची कहाणी देखील यावेळी सांगितली असून ही कहाणी सांगताना ते भावुकही झाले, ‘मी पहिल्यांदा डेन्टिस्ट (Dentist) होतो त्यानंतर विधिज्ञच्या मी वाटेवर आलो. यातच माझी आई फार जिद्दी आहे आणि तिला खोटे बोलता येत नाही. माझ्या आईची फार इच्छा होती की मी डॉक्टर व्हावे, काहीही झालं तरी मी डॉक्टर झालोच पाहिजे असं तिला वाटत होतं.’ तसेच, ‘त्याच्याविरोधात घरात दुसरा एक विचार होता आणि तो म्हणजे माझी आजी. माझ्या घरात ५ जण गुन्हेगार होते आणि म्हणुन माझ्या आजीला डाकुंची आई असं म्हटलं जायचे.’
Trimbakeshwar | अधिकारी-मंत्र्यांनीच आता सिंहस्थाचे शाहीस्नान करावे; साधू-महंत भडकले
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते हे महाराष्ट्रातील विधिज्ञ असून महाराष्ट्र शासनाने २०१८ साली मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवगातंर्गत आरक्षण दिलेले होते. मात्र मराठ्यांना दिलेले आरक्षण हे असंवैधानिक असल्याची याचिका त्यांनी सर्वोच्च न्यायालयात यशस्वीपणे लढवली. ॲडव्होकेट सदावर्ते हे मुळचे नांदेडचे असून त्यांचे शिक्षण औरंगाबाद आणि मुंबईत झाले आहे. ते अनेक चळवळींत आधीपासूनच सक्रिय होते. काही वर्षांपूर्वी सदावर्ते नादेडहून येऊन मुंबईत स्थायिक झाले आणि तेथेच ते वकिली करू लागलेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम