कट्टर शिवसैनिक आमनसामने; मंत्री असाल ते घरचे म्हणत गोऱ्हेनीं गुलाबरावांना केलं बेअब्रू

0
46

Maharashtra Vidhan Parishad : सेनेतील बंडा नंतर निष्ठावंत विरुद्ध बंडखोर हा सामना अधिक तीव्र झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आज नीलम गोऱ्हे यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना खडसवताना कुठलीच भीडभाड ठेवली नसल्याने सर्वच आवक झाले. शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधानपरिषदेत शिक्षकांच्या निधीवरुन अनेक प्रश्न विचारले. याविषयी विधानपरिषदेत चर्चा सुरु असताना. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यादरम्यान खाली बसून गुलाबराव पाटील काहीसे कुजबुजत होते. उपसभापती नीलम गोऱ्हे यांना ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी गुलाबराव पाटील यांना समज दिली. मात्र पाटील काही बोलने थांबवत नव्हते आणि हातवारे करत असल्याने गोऱ्हेंना राग अनावर झाला व त्यांनी चांगलेच खडसावले.

राज्यांची मुलुखमैदान तोफ गुलाबराव पाटील जे काही जोशात विधान परिषदेत भाषण करत होते. छाती बडवून ते आपला मुद्दा मांडत होते हे मात्र यावेळी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अजिबात आवडले नाही गुलाबरावांना सूचना देखील केली. त्यावर उपसभापती ताई आपण मध्ये बोलू नका… असं म्हणत गुलाबरावांनी नीलम गोऱ्हे यांच्याकडे हातवारे केले. हे कृत्य बघून नीलम गोऱ्हे चांगल्याच संतापल्या. “तुम्ही आताच्या आता खाली बसा. तुमची ही बोलायची पद्धत आहे का? छाती बडवून विधान परिषदेत काय बोलता… बसा खाली… मंत्री असाल तुमच्या घरी….” अशा शब्दात मुलुख मैदानी आक्रस्ताळेपणा करणाऱ्या गुलाबराव पाटलांना नीलम गोऱ्हे यांनी चांगलेच फटकारले.

केसरकर एका प्रश्नाला उत्तर देत असताना, विरोधीपक्ष नेते म्हणाले की एक मंत्री दादागिरीची भाषा करत होता, त्यावेळी मी मंत्रिमंडळातील सदस्य होतो, अनिल परबांना विचारा ते मंत्री होते, एसटीचा पगार देऊ शकले नाही….” असे मुद्दे आक्रमक अंदाजात गुलाबराव पाटील छाती बडवत मांडत होते. हे पाहून मात्र नीलम गोऱ्हेंनी भाषणाच्या मध्ये त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. हेच गुलाबरावांना खटकलं.. त्यांनी नीलम गोऱ्हेंना हातवारे करत मध्ये बोलू नका.. असा रागाच्या सुरातच सांगितलं अन् गोऱ्हे भडकल्या त्यांच्यातील शिवसैनिक जागा झाला अन् गुलाबरावांची खरडपट्टी काढली.

गोऱ्हे संतापल्या अन् म्हणाल्या ‘सभागृहात बोलण्याची ही कोणती पद्धत आहे ? , परत हात वर करतात की मला बोलायचं आहे आणि माझ्याकडे बघून हातवारे करताय… तुमचं म्हणणं काय आहे रेकॉर्डवर घ्या, तुम्ही कोणाला इशारा करताय…., तुम्ही ताबडतोब खाली बसा आणि तुमचं निवेदन थांबवा, मंत्रीमहोदय ही पद्धत नाही. मी तुम्हाला ताकीद देते, केसरकरांच्या शिक्षण विभागाचा प्रश्न आहे, तेव्हा तुम्ही कॅबिनेटमध्ये काय करत होता त्याचा आता काय संबंध आहे आणि काय छातीवर हात आपटून वगैरे बोलताय, खाली बसा, ही पद्धत नाहीये वागायची”, अशा शब्दात नीलम गोऱ्हे यांनी गुलाबरावांना फटकारले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here