Skip to content

ग्रामपंचायत निवडणूक तारीख जाहीर; देवळा तालुक्यातील 13 गावांचा समावेश


देवळा ; देवळा तालुक्यातील माहे जानेवारी 2021 ते डिसेबर -2022 मध्ये मुदत संपणाऱ्या एकूण 13 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे .

कार्यक्रम पुढील प्रमाणे
तहसिलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिध्द करण्याचा दिनांक- 5 जुलै रोजी

नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा दिनांक व वेळ
दिनांक १२/०७/२०२२ (मंगळवार) ते दिनांक १९/०७/२०२२ (मंगळवार) वेळ स. ११.०० ते दु. ३.०० (दिनांक १६/०७/२०२२ चा शनिवार व दिनांक १७/०७/२०२२ चा रविवार वगळून)

नामनिर्देशनपत्र छाननी करण्याचा दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)
दिनांक २०/०७/२०२२ (बुधवार) वेळ सकाळी ११.०० वा. पासून छाननी संपेपर्यंत

नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा अंतिम दिनांक व वेळ (नमुना अ अ मध्ये नमूद केलेल्या ठिकाणी)
दिनांक २२/०७/२०२२ (शुक्रवार) दुपारी ३.०० वा. पर्यंत

निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्याचा दिनांक व वेळ
दिनांक २२/०७/२०२२ ( शुक्रवार) दुपारी ३.०० वा. नंतर

मतदानाचा दिनांक
दिनांक ०४/०८/२०२२ (गुरूवार) सकाळी ७.३० वा. पासून ते सायं. ५.३० वा.

मतमोजणी व निकाल घोषित करण्याचा दिनांक (मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्चित करतील त्यानुसार राहील)
दिनांक ०५/०७/२०२२ (मंगळवार)

जुलै २०२१ मध्ये मुदत संपलेल्या व प्रशासक असलेल्या देवळा तालुक्यातील १३ ग्रामपंचायती

देवळा तालुक्यातील 13 ग्रामपंचायत पुढीलप्रमाणे – विजयनगर, पिंपळगाव, खुंटेवाडी, वाखारी, शेरी, रामेश्वर, सुभाषनगर, सावकी, खर्डे, वार्षी, खडकतळे, गुंजाळनगर, कापशी

आरक्षण सोडत कधी झाली….
सदर कार्यक्रमानुसार 6 जून रोजी विशेष ग्रामसभा बोलावुन तहसिलदार यांनी प्राधिकृत केलेल्या अधिका – यांच्या अध्यक्षतेखाली प्रारुप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत अनुसूचित जाती महिला , अनुसूचित जमाती महिला व सर्वसाधारण महिला आरक्षण काढले आहे. 6 जून रोजी रोजी विशेष ग्रामसभेमध्ये प्रारूप रचनेवर आरक्षणाची सोडत काढणेकरीता संबंधित ग्रामपंचायतीसाठी प्राधिकृत अधिकाऱ्यांची नेमणुक करण्यात आली होती त्यानुसार प्रारूप प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत काढण्यात आल्याची माहिती तहसीलदार विजय सूर्यवंशी यांनी दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!