राज्यभरातल्या २ हजार ३६९ ग्रामपंचायतींंची मतमोजणी आज होत आहे. या गावांना त्यांचा नवा कारभारी आता मिळणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली होती.
- श्रीगोंदा | तालुक्यातील विसापूर ग्रामपंचायत सरपंच पदाचा निकाल हाती लागलेला आहे. काँग्रेस गटाचे काका जठार यांची सरपंचपदी वर्णी तर जिल्ह्यातील दोन निकाल हाती, एक काँग्रेसकडे तर एकावर शरद पवार गटाचा विजय. श्रीगोंदा तालुक्यात भाजपला धक्का बसलेला आहे.
- बारामती मधील 8 ग्रामपंचायतींपैकी 8 ही ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचं वर्चस्व पहायला मिळत आहे. बारामतीत अजित पवार गटाची सत्ता.
- सांगोल्यात शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांना मोठा धक्का बसला, खवासपूर ग्रामपंचायतीमध्ये शेकापचे संजय दिक्षीत विजयी झाले आहेत.
- मंगळवेढा तालुक्यातील ९ ग्रामपंचायत भाजपने जिंकल्या आहेत. देगाव, खडकी, जूनोनी, महमदबाद, अकोले, उचेठान, बठान, शेलेवाडी जिंकलेल्या आहेत, तर शिरसी ग्रामपंचायत स्थानिक आघाडी विजयी झाले आहेत.
- पालघरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने खातं उघडलं आहे. पालघरमधील उच्छेळी आणि उनभाट ग्रामपंचायतींवर उद्धव ठाकरेंची मशाल. दोन्ही ग्रामपंचायतींवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सरपंच विजयी.
breaking news | देवळ्यातून पहिला निकाल हाती; बघा कोणाचे उघडले खाते
- बारामती तालुक्यातील 3 ग्रामपंचायतचा निकाल हाती आलेले आहेत. या तीनही ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे सत्ता गेली आहे. भोंडवे वाडी, म्हसोबा नगर आणि पवई माळ या तिन्ही ठिकाणी अजित पवार गट पुरस्कृत पॅनल विजयी.
- पंढरपूरच्या गुरसाळे ग्रामपंचायतीमध्ये ४० वर्षानंतर सत्तांतर झालंय. अभिजीत पाटील गटाचे दिपक शिंदे विजयी तर राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे गटाला मोठा धक्का. विठ्ठलचे माजी संचालक मोहन कोळेकर गटाला मोठा धक्का बसलेला आहे.
- कराडमधील येणपे ग्रामपंचायतीवर काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. चव्हाण आणि उंडाळकर गटाला सत्ता राखण्यात यश आलेले आहे. दक्षिण सोलापूरमधील दोड्डी ग्रामपंचायत काँग्रेसकडे गेली आहे. दोड्डी ग्रामपंचायतमध्ये भाजपला मोठा धक्का बसलेला आहे.
- राधानरगरीमधील चांदेकरवाडी ग्रामपंचायत ठाकरे गटाकडे गेली आहे. तर, करवीरमध्ये शिंदे गटाचा उमेदवार विजयी झालेला आहे.
ग्राम पंचायत निवडणूकांचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झालेली आहे. पहिला निकाल हाती आलेला आहे. शिंदे गटाने विजयी शुभारंभ केलेला आहे. करवीर तालुक्यातील धोंडेवाडी ग्राम पंचायत शिंदे गटाकडे केली आहे. आतापर्यंत महायुतीचा १९९ ग्रामपंचायतींवर विजय झालेला आहे. भाजप आणि अजीत पवार गटामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळते आहे. महाविकास आघाडीचा आतापर्यंत ६९ ग्रामपंचायतीवर विजय झालेला आहे.
राज्यात एकूण २३५९ ग्राम पंचायती आहेत. त्यात २९३ ग्राम पंचायतींचे निकाल बिनविरोध लागले आहेत.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम