Government Scheme | सरकारची महिलांसाठी खास योजना

0
9

Government Scheme |  शासन नेहमीच नागरीकांसाठी नवनवीन योजना आणत असते. वयोवृद्धापासून ते महिलांसाठी उपयोगी योजना शासनातर्फे राबवण्यात येतात. दरम्यान, सरकारने आता महिलांसाठी ‘महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट’ ही योजना राबवली आहे. महिलांचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही योजना महिलांसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. यात महिला काही काळासाठी गुंतवणूक करुन मोठी बचत करु शकणार आहेत. ह्या योजनेत सर्व वयोगटांतील महिला ह्या गुंतवणूक करु शकतात. जाणून घेऊया या योजनेबद्दल अधिक माहिती –

अशी आहे महिला सन्मान बचत योजना

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेअंतर्गत महिला १ हजारांपासून ते २ लाखांपर्यंत गुंतवणूक करु शकणार आहेत. या योजनेअंतर्गत तुम्ही २०२३ मध्ये खाते उघडल्यास दोन वर्षात म्हणजे २०२५ मध्ये या खात्याची मॅच्युरिटी होईल. आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला रक्कमेवर ७.५० टक्के व्याजदरही मिळेल.

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट या योजनेत महिलांना १ हजारांपासून ते २ लाखांपर्यंत पैसे गुंतवू शकतात. जर एखाद्या मुलीचे वय १८ वर्षांपेक्षा कमी असेल तर ती तिच्या पालकांच्या मदतीने पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडू शकेल. या खात्यात गुंतवणूक केल्यास आयकर कलम 80 C अंतर्गत १.५० लाख रुपयांची सुटही मिळणार आहे.

Crime news | दिवाळी साजरी कशी करायची; दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन

 खात कसं उघडायचं?

महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट योजनेत तुम्ही पोस्ट ऑफिसमध्ये, कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदा ह्या बँकांमध्ये खाते उघडू शकतात. हे खाते उघडण्यासाठी १ फॉर्म भरावा लागेल. या योजनेत खाते उघडण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, केवायसी कागदपत्रे तसेच पासपोर्ट फोटो लागणार आहे.

मुदतीआधीही पैसे काढता येणार

ह्या योजनेतील खातेधारकांना गरज असल्यास एका वर्षानंतरही महिला बचत योजनेच्या खात्यातून ४० टक्के रक्कम काढता येणार आहे.

Nashik | शिवमहापुराण कथेचं मैदान पुन्हा बदललं; मंडप भूमिपूजन सोहळा उद्या


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here