Maratha reservation | सरकारने ओबीसी नेत्यांचे लाड करू नये- जरांगे पाटील

0
17

Maratha reservation |  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या, उगाच आम्हाला गाजर दाखवू नका असे वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे. आमचं आरक्षण ओबीसीमध्ये आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. त्यामुळे ते आम्हाला कमी मिळेल असे वाटत नाही असेही ते म्हणाले. मनुष्यबळ वाढवा आणि २४ डिसेंबरच्या आत अहवाल देऊन आम्हाला आरक्षण द्या, नाहीतर जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

सरकारबाबत मी सॉफ्ट नाहीच

स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून नोंदी शोधण्याच्या कामाला गती द्यावी. अशी माझी विनंती असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. उपोषण सोडताना जे ठरलेलं होतं त्याबाबत अजूनही सरकारने Time Bond दिलेला नाही, तो तातडीने द्यावा ही विनंती. बच्चू कडूंसोबत विशेष चर्चा झालेली नाही, ते भेटायला आले, फक्त त्यांना आठवण दिली आपलं जे ठरलं ते द्यायला सांगा, सरकारला पुन्हा एकदा आठवण करुन द्या, असे जरांगे पाटील म्हणाले. सरकारबाबत मी सॉफ्ट नसल्याचेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले.

Diwali 2023 | धनत्रयोदशीला सोनं खरेदी का करावं?

कार्तिकी पूजा मी करावी 

पंढरपूरला कार्तिकी एकादशीची पूजा मी करावी हे ऐकून मी भरून पावलो, आम्हाला हेच खूप झाले असे, जरांगे पाटील म्हणाले. जर कुणी त्यावर सही करत नसेल तर त्यांना हे खूप जड जाईल, हातात ताकत नसेल तर दिवाळीचा फराळ खाऊन सह्या करा. फक्त निव्वळ साह्यासाठी time bond अडकले असेल तर ते योग्य नाही.

नाहीतर खूप जड जाईल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. धनगर समाज आता जागा झाला आहे, त्याचा मला आनंद आहे. धनगर बांधव एकत्र आले तर, न्याय मिळेलच आणि आम्ही दोघे एकत्र आलो तर सरकारची फजिती होईल असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

 ओबीसी नेत्यांचे लाड करु नये

ज्यांच्या कुणबी नोंदी असतील त्यांना आरक्षण मिळायला हवे. सरकारनं नोंदी शोधण्याच्या बाबतीत निधी कमी पडू देऊ नये. तातडीने वर्ग करावे, नाहीतर आम्हाला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, खोटी फसवणूक हा मराठा समाज सहन करणार नाही. तसेच सरकारने शेतकऱ्यांकडेही लक्ष द्यावे, उगाच काही ओबीसी नेत्यांचे लाड करू नये, असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

Onion Market | कांदाप्रश्नी केंद्राचं वरातीमागून घोडं!


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here