Gold Silver Rate Today | चांदी खरेदीसाठी योग्य वेळ; असे आहेत सोने-चांदीचे दर

0
47
Gold Silver Price 29 May 2024
Gold Silver Price 29 May 2024

Gold Silver Rate Today | मागील वर्षी सोन्याचे दर हे गगनाला भिडलेले होते. मात्र, यावर्षी त्यांनी सोने- चांदीच्या खरेदीदारांना आनंदवार्ता दिली असून, यावर्षी पहिल्या महिन्यापासूनच दरांमध्ये सतत घसरण होत आहे. किरकोळ दरवाढ वगळता, सोन्यासाह चांदीही गेल्या वर्षीच्या तुलनेत खाली आली आहे.

जानेवारी आणि आता हा महिनाही संपत आला असून, याही महिन्यात काही विशेष अशी दर वाढ झालेली नाही. तर, गेल्या आठवड्यात सोन्याचे दर हे तब्बल ९०० रुपयांनी खाली अले. तर, चांदीचे दर हे १५०० रुपयांनी वर सरकले आहेत. तर, रविवारी सोने ३०० रुपयांनी तर चांदीचे दर तब्बल २००० रुपयांनी महागली. सोमवारी देखील दरांमध्ये वाढ झाली असून, आज असे आहेत सोने-चांदीचा भाव… (Gold Silver Rate Today)

Gold Silver Rate Today | सोन्याच्या किंमतीत घसरण

मागील आठवड्याच्या शेवटच्या दिवसांत सोन्याच्या भावात १६ फेब्रुवारीला २०० आणि १७ फेब्रुवारीला १०० रुपयांनी वाढ झाली. गेल्या दोन दिवसांत सोने तब्बल ३०० रुपयांनी महागले आहे. तर, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी सोने २७० रुपयांनी वाढले. यानंतर काल भाव १०० रुपयांनी घसरले. तर, गुडरिटर्न्सनुसार आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६२,७१० रुपये असे आहेत. तर, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ५७,५०० रुपये असे आहे.

चांदी झाली स्वस्त 

चांदीच्या किंमतीत गेल्या काही दिवसांपासून सतत वाढ होत असून, आज मार, चांदिने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला असून, आज चांदीच्या दरांमध्ये घसरण झाली आहे. गेल्या १६ फेब्रुवारी रोजी चांदीचे दर हे तब्बल ११०० रुपयांनी अधले होते. त्यानंतर १७ फेब्रुवारीला पुन्हा किंमतीत ९०० रुपयांची वाढ झाली. तर या आठवड्यात सोमवार रोजी चांदीच्या किंमतीत ५०० रुपयांची घसरण झाली. काल पुन्हा किंमती ५०० रुपयांनी खाली आल्या. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज  एक किलो चांदीचे दर हे ७५,५०० रुपये असे आहेत.(Gold Silver Rate Today)

Gold Silver Rate Today | बजेटपूर्वी सोने-चांदीच्या भावात मोठी अपडेट

असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे भाव

 इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोन्याचे दर वाढले आहेत. तर, चांदीच्या किंमतीत घसरण झाली आहे. असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर..
  • २४  कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६२,१३९ रुपये,
  • २३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ६१,८९० रुपये,
  • २२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ५६,९१९ रुपये,
  • १८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ४६,६०४ रुपये,
  • १४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) सोने – ३६,५५१  रुपये असे आहेत.
  • तर, एक किलो चांदीचा आजचा भाव हा ७०,८९८ रुपये असा आहे.(Gold Silver Rate Today)

(टीप- वरील बाबी ‘द पॉइंट नाऊ’ केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत असून, याद्वारे आम्ही कोणताही दावा करत नाही. वरील दर हे सूचक असून, यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलर्ससोबत संपर्क साधावा.)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here