Gold Silver Rate | सोने- चांदी खरेदीचा हाच ‘गोल्डन चान्स’

0
34
Gold Silver Price 30 May 2024
Gold Silver Price 30 May 2024

Gold Silver Rate |  दसरा-दिवाळीपासून वर असलेला सोन्याचा आलेख हा ह्या आठवड्यात किंचित खाली आला होता. दरम्यान, ह्या आठवड्यात गुरुवारी हा आलेख पुन्हा दुप्पटीने वर सरकला आणि त्यानंतर पुन्हा दरवाढ सुरू झाली. मात्र, आज पुन्हा सोन्याच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात घट झाली असून, ऐन लग्न सराईत खरेदीदारांना सोन्याने दिलासा दिला आहे.

दरम्यान, आता आज मात्र, सोने-चांदीच्या दरांना पुन्हा ब्रेक लागला आहे त्यामुळे ह्या आठवड्याच्या शेवटी आणि पुढच्या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ह्या आठवड्यात भाव स्थिर राहिले नसून, सुरुवातीला किंमतींचे  उच्चांकी रेकॉर्ड बनले आणि नंतर ते दर जरा खाली आले. पण, गुरुवारी पुन्हा उसळी घेत सोने झळाळले.

Gold Silver Rate | सोने-चांदीची मोठी मुसंडी; ग्राहकांचा हिरमोड

ह्या आठवड्यात शुक्रवारी पुन्हा सोन्याच्या दरांमध्ये दुप्पटीने दरवाढ झाली. आणि शनिवारी पुन्हा सोने चांदिने ग्राहकांना किंचित दिलासा दिला आणि दोन्ही धातूंचे भाव घसरले. गेल्या दिवाळीपासून सोने-चांदीने या वर्षीचे पूर्वीचे रेकॉर्ड मोडत नवे रेकॉर्ड तयार केलेत. त्यामुळे ऐन लग्नाच्या मोसमात सोन्याच्या वाढत्या दरांनी वधू पित्यांची चिंता वाढवली होती. दरम्यान, सोन्यात आणखी घसरण होण्याची ग्राहक वाट बघत आहेत. जाणून घ्या काय आहे  सोने-चांदीचा आजचे दर?

सोन्याची माघार |Gold Silver Rate

ह्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचे दर हे अनुक्रमे २२० रुपयांनी वाढले. तर, बुधवारी ह्या दरांमध्ये १०० रुपयांनी घसरण झाली. गेल्या तीन दिवसांमध्ये सोन्यात ५५० रुपयांनी घसरण झाली आणि १४ डिसेंबर गुरुवार रोजी सोन्यात थेट १ हजार रुपयांनी वाढ झाली. त्यानंतर १५ डिसेंबर रोजी सोने १०० रुपयांनी वाढले. तर, १६ डिसेंबर रोजी ४५० रुपयांची किंमती पुन्हा घसरल्या. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट प्रति तोळा सोन्याचे दर हे  ५७,४५० रुपये आणि २४ कॅरेट प्रति तोळा सोन्याचे दर हे  ६२,६६० रुपये असे आहेत.

Gold Silver Rate | सोने-चांदीचा ‘यु टर्न’; असे आहेत आजचे दर

चांदीत इतकी घसरण

ह्या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीत हजार रुपयांची घसरण झाली होती. दरम्यान, गुरुवार (दि. १४ डिसेंबर) चांदीने २५०० रुपयांची मुसंडी घेतली. तर, १५ डिसेंबर रोजी चांदीच्या दरांत तब्बल एक हजार रुपयांची दरवाढ झाली असून, गेल्या दोन दिवसांत चांदीत ३,५०० रुपयांची वाढ झाली. काल पुन्हा चांदीच्या दरांमध्ये ८०० रुपयांनी घसरले. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचे दर हे  ७७,७०० रुपये असे आहेत.

 


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here