Gold Silver Rate | दिवाळीपासून ते आता ऐन लग्नसराईतही सोने-चांदीचे भाव (Gold Silver Rate) हे ढगाला लागल्याने ग्राहकांचा मोठा हिरमोड झाला होता. पण, ह्या आठवड्यात या मौल्यवान धातूंच्या दरांमध्ये काही प्रमाणात घसरण झाली होती. त्यामुळे ग्राहक हे भाव आणखी खाली येण्याची वाट पाहत असतानाच, आता पुन्हा सोने-चांदीच्या दरांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
दरम्यान, आता सोने-चांदीच्या किंमतींचा (Gold Silver Rate) आलेख पुन्हा वर गेला आहे. ह्या आठवड्याच्या सुरुवातीला सोने-चांदीच्या किंमतींमध्ये किंचित घसरण झाल्याने खरेदीदारांना दर आणखी कमी होण्याची आशा होती. त्यातच ह्या गुरुवारी किंमतींनी युटर्न घेतल्याने सोन्याच्या भावात थेट एक हजाराने तर चांदीच्या भावात थेट अडीच हजार रुपयांनी भर पडली.
गेल्या दिवाळी-दसऱ्यापासूनच सोने-चांदीने आगेकूच सुरु ठेवली होती. पण, ह्या महिन्याच्या सुरुवातीला या दरवाढीला ब्रेक लागल्याने गरकांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. दरम्यान, या आठवड्यातही तीन दिवस भावांमध्ये मोठी घसरण होत असतानाच मागील गुरुवारपासून ह्या मौल्यवान धातूंच्या दरांनी मोठी उसळी घेतली आहे. तर, आता काही दिवसांतच सोन्याचा हा चढता आलेख पुन्हा किंमतींचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तर, असे आहेत आजचे सोने आणि चांदीचे भाव (Gold Silver Rate)…
Gold Silver Rate | सोने-चांदीचा ‘यु टर्न’; असे आहेत आजचे दर
सोन्यात दरवाढ (Gold Silver Rate)
ह्या आठवड्याच्या सुरुवातीचे तीन दिवस सोन्याच्या दरांत घसरण सुरू होती. याकाळात सोने हे ५५० रुपयांनी स्वस्त झाले होते. सोमवारी आणि मंगळवारी अनुक्रमे सोने प्रत्येकी २२० रुपये तर, बुधवार रोजी १०० रुपयांनी दरांमध्ये घसरण झाली. दरम्यान, (दि. १४ डिसेंबर) गुरुवार रोजी सोन्याच्या किंमतींमध्ये १ हजार रुपयांनी दरवाढ झाली. तर, १५ डिसेंबर रोजी सोने पुन्हा १०० रुपयांनी वाढले. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा आजचा भाव हा ६३,१५० रुपये तर, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५७,९०० रुपये असे आहेत. (Gold Silver rate Today 16 December 2023)
Gold scheme | सरकार देतंय सोने गुंतवणुकीची गोल्डन ऑफर
असे आहेत १४ ते २४ कॅरेटचे भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज सोन्याचे दर हे प्रत्येक कॅरेटनुसार पुढीलप्रमाणे आहेत, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे आज ६२,३७६ रुपये इतके आहे. तर, २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ६२,११७ रुपये असे आहे. २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५७,१२८ रुपयांवर पोहोचले आहे. आणि १८ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ४६,७७५ रुपये असे आहे. १४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ३६,४८५ रुपये असे आहे. तर, एक किलो चांदीचे दर हे आज ७४,२७३ रुपयांवर पोहोचले आहे.(Gold Silver Rate)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम