Gold Silver Price 5 June 2024 | संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल काल ४ जून रोजी जाहीर झाला. दरम्यान, जसजसे निकाल जाहीर होत होते. तसे इकडे शेअर बाजारातही मोठी आदळआपट पहायला मिळाली. एकूणच जसा निकालाचा परिणाम काल शेअर बाजारावर झाला. तसाच आज तो सोने चांदीच्या किंमतींवरही झाल्याचे पहायला मिळाले.
कारण या लोकसभा निवडणूकीचा निकाल हा पूर्णपणे अनपेक्षित होता. तर, एक्जिट पोलच्या अंदाजानुसार गुंतवणुक केलेल्यांना याचाअ मोठा फटका बसला. कारण कालचा निकाल हा पूर्णपणे एक्जिट पोलच्या विरोधात होता. तर, काल निकालापूर्वी सोने-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली असली. तरी, आज निकालानंतर मात्र या दोन्ही धातूंच्या किंमतींनी मोठी मुसंडी घेतली. या दोन्ही धातूंच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून, बघा काय आहेत आज सोने आणि चांदीचे दर…? (Gold Silver Price 5 June 2024)
काल घसरण आणि आज मोठी उसळी
गेल्या दोन महिन्यात सोने चांदीचे दर गगनाला भिडलेले असले. तरीही या महिन्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला होता. त्यामुळे आता कुठे ग्राहकांना दिलासा मिळत होता. तर, निकालानंतर किंमतींनी मोठी उसळी घेतली आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला सोने ३० मे – ४४० रुपये, १ जून – २१० रुपये, ३ जून – ४४० रुपयांनी स्वस्त झाले. तर, ४ जून रोजी सोन्याच्या किंमतीत ७६० रुपयांची दरवाढ झाली. तर, गुडरिटर्न्सनुसार आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ७३,०२० रुपये तर, २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६६, ९५० रुपये असे आहेत.
Gold Silver Price 1 June 2024 | दोन दिवसांत मोठी घसरण; असे आहेत सोने चांदीचे दर
Gold Silver Price 5 June 2024 | चांदीच्या किंमतींचीही मुसंडी
तर, या महिन्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या पाठोपाठ चांदीतही घसरणीचे सत्र दिसले. गेल्या पाच दिवसांतच चांदीत तब्बल ५ हजारांची घसरण झाली. ३० मे – १,२०० रुपये, ३१ मे – १,००० रुपये, १ जून – २,०००, ३ जून – ७०० रुपयांनी किंमतीत घसरण झाली. मात्र, ५ जून रोजी चांदीच्या किंमतींनी १,२०० रुपयांनी झेप घेतली आहे. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचा दर हा ९४,००० रुपये असा आहे.(Gold Silver Price 5 June 2024)
Gold Silver Price 31 May 2024 | ग्राहकांना दिलासा..!; सोने चांदीच्या दरात घसरण
असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…
२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७१,९६९ रुपये,
२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७१,६८१ रुपये,
२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६५,९२४ रुपये,
१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५३,९७७ रुपये,
१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,१०२ रुपये असा आहे.
तर, एक किलो चांदीचा भाव हा ८८,८३७ रुपये असा आहे. (Gold Silver Price 5 June 2024)
(टीप – वरील दर हे सूचक आहेत. त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम