Gold Silver Price 31 May 2024 | गेल्या दोन महिन्यांपासून सोने चांदीच्या दरात वाढ होत असून, आता सोने जवळपास सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेले आहे. मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात सोने आणि चांदीने दरवाढीचा रेकॉर्ड तयार केला. सलग सुरू असलेल्या या दरवाढीला गेल्या आठवड्यात ब्रेक लागला आणि सोन्याचे दर जवळपास २,७०० रुपयांनी घसरले. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच ती कसर सोने चांदिने भरून काढली.
आता सोन्याने जवळपास ७५ हजारांचा टप्पा ओलांडला असून, तर चांदीहे एलवकरच लाखाच्या घरात पोहोचेल. तर, तज्ज्ञांच्या मते सोने लवकरच ८१,००० रुपयांच्या घरात जाईल, तर चांदी लाखाच्या घरात जाईल. या आठवड्यात चांदीने मोठी झेप घेतली असून, चांदीत तब्बल ६,००० रुपयांची वाढ झाली आहे. आज असे आहेत सोने चांदीचे दर (Gold Silver Price 31 May 2024)
Gold Silver Price 31 May 2024 | सोने घसरले
गेल्या आठवड्यात सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असून, दर तब्बल २,७०० रुपयांनी घसरले. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला त्याची कसर भरून काढली असून, तीन दिवसांतच सोने ७५० रुपयांनी महागले आहे. २७ मे रोजी २७०, २८ मे रोजी २२० आणि २९ मे रोजी २७० रुपयांनी सोन्यात दरवाढ झाली. काल ३० मे रोजी सोन्याच्या भावात ४४० रुपयांची घसरण आली आणि आज गुडरिटर्न्सनुसार, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा ७२,९१० रुपये आणि २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ६६,८५० रुपये असा आहे.
Gold Silver Price 30 May 2024 | चांदी लवकरच लाखाच्या घरात; असे आहेत आजचे सोने चांदीचे दर
चांदीही झाली स्वस्त
गेल्या आठवड्यात चांदीनेही ग्राहकांना दिलासा दिला होता. तर, या आठवड्यात तीन दिवसांतच चांदीत ६ हजारांची दरवाढ झाली. २७ मे रोजी १,५०० रुपयांनी, २८ मे रोजी ३,५०० रुपयांनी तर २९ मे रोजी १,२०० रुपयांनी दरवाढ झाली. ३० मे रोजी चांदीत १,२०० रुपयांची घसरण झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदीचा दर हा ९६,५०० रुपये असा आहे.(Gold Silver Price 31 May 2024)
असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…
२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,११५ रुपये,
२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७१,८२६ रुपये,
२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६६,०५७ रुपये,
१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५४,०८६ रुपये,
१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,१८७ रुपये असा आहे.
तर, एक किलो चांदीचा भाव हा ९२,६७३ रुपये असा आहे. (Gold Silver Price 31 May 2024)
(टीप – वरील दर हे सूचक आहेत. त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)
Gold Silver Price 29 May 2024 | सोने चांदीत दरवाढ कायम; असे आहेत आजचे दर
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम