Gold Silver Price 30 May 2024 | चांदी लवकरच लाखाच्या घरात; असे आहेत आजचे सोने चांदीचे दर

0
70
Gold Silver Price 30 May 2024
Gold Silver Price 30 May 2024

Gold Silver Price 30 May 2024 |  महिनाभरापासून सुरू असलेल्या दरवाढीला गेल्या आठवड्यात काहीसा ब्रेक मिळाला. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीलाच सर्व घसरणीची किंमत दुप्पटीने वसूल करत सोने चांदीने दरवाढीत आघाडी घेतली आहे. बुधवार पर्यंतच सोने चांदीने मोठी झेप घेतली असून, सोन्याने पुन्हा मोठा पल्ला गाठला आहे. तर, लाखाकडे कूच केलेल्या चांदीनेही गेल्या आठवड्यात ग्राहकांना दिलासा दिला. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला चांदीनेही मागील आठवड्याची कसर भरून काढली असून, चांदीही आता लाखाच्या घरात जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जाणून घेऊयात आज कसे आहेत सोने चांदीचे दर… (Gold Silver Price 30 May 2024)

सोन्याच्या किंमतीत वाढ 

गेल्या आठवड्यात सोन्याने ग्राहकांना काहीसा दिलासा दिला होता. तब्बल २७०० रुपयांनी दर खाली आले होते. तर, या आठवड्यात सोन्याने पुन्हा दरवाढीकडे कुच केली असून, सोन्याच्या किंमतींनी आगेकूच केली आहे. २७ मे रोजी सोने २७० रुपयांची वाढ, २८ मे रोजी २२० रुपयांची वाढ, आणि २९ मे रोजी २७० रुपयांनी किंमती वाढल्या आहेत. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने ७३,३५० रुपये आणि २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६७,२५० रुपये असा आहे.(Gold Silver Price 30 May 2024)

Gold Silver Price 29 May 2024 | सोने चांदीत दरवाढ कायम; असे आहेत आजचे दर

Gold Silver Price 30 May 2024 | चांदीतही दरवाढ 

गेल्या आठवड्यात चांदीत ६ हजारांची घसरण झाली. तर, या आठवड्यात चांदिने सुरुवातीच्या तीन दिवसांतच ही कसर भरुन काढली आहे.  २७ मे रोजी चांदीत १,५०० आणि २८ मे रोजी ३,५००, तर २९ मे रोजी किंमतीत १,२०० रुपयांची दरवाढ झाली. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव हा ९७,७०० रुपये असा आहे.

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,४१३ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,१२३ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६६,३३० रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५४,३१० रुपये,

१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,३६२ रुपये असा आहे.

तर, एक किलो चांदीचा भाव हा ९४,११८ रुपये असा आहे. (Gold Silver Price 30 May 2024)

(टीप – वरील दर हे सूचक आहेत. त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)

Gold Silver Price 28 May 2024 | ग्राहकांना दिलासा नाहीच..!; सोने चांदीच्या किंमतीत पुन्हा वाढ


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here