Gold Silver Price 26 April 2024 | जागतिक स्तरावर इस्राइल आणि इराण यांच्यातील संघर्ष काहीसा कमी झाल्याने जागतिक बाजारही जरा विसावले आहे. त्यामुळे याचा परिणाम आता सोने-चांदीच्या दरांवर लागेच दिसून आला. या दोन्ही देशांनी घेतलेल्या संयमी भूमिकेमुळे बाजार आटोक्यात आले आहे. मात्र, दुसरीकडे चीनमुळे सोने, चांदी व तांब्याच्या दरांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. चीन तैवानवर हल्ला करू शकतो. अशी भीती त्या देशातील नागरिकांना असल्याने येथील नागरिक कुठल्याही दराने मौल्यवान धातू खरेदी करत आहे. दरम्यान, या आठवड्यात भारतीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या किंमतीत काहीशी नरमाई दिसत असून, चांदीत गेल्या 9 दिवसांत 4 हजारांची घसरण झाली आहे. जाणून घेऊयात काय आहेत आजचा सोने चांदीचा भाव..(Gold Silver Price 26 April 2024)
सोन्याच्या किंमतीत किती घसरण
गेल्या चार दिवसांत सोन्याच्या किंमतींनी खरेदीदारांना मोठा दिलासा दिला आहे. मागील चार दिवसांतच सोने हे तब्बल 2400 रुपयांनी घसरले. तर, 22 एप्रिल रोजी सोन्याच्या किंमतीत 550 रुपयांची घसरण झाली. 23 एप्रिलला दर 1530 रुपयांनी खाली आले. मात्र, 24 एप्रिल रोजी 450 रुपयांनी सोन्याच्या दरांत वाढ झाली. तर आज 26 एप्रिल रोजी सोन्याचे दर पुन्हा 350 रुपयांनी खाली आले. दरम्यान गुडरिटर्न्सनुसार, आज 22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 66,400 रुपये आणि 24 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर हा 72,420 रुपये असा आहे.(Gold Silver Price 26 April 2024)
Gold Silver Price 26 April 2024 | चांदीत मोठी घसरण
गेल्या नऊ दिवसांत चांदीच्या किंमतीत मोठी घसरण झाली असून, मागील आठवड्यात 17 एप्रिल रोजी चांदीच्या किंमती 500 रुपयांनी खाली आल्या. तर, या आठवड्यात 22 एप्रिल रोजी चांदीत 1 हजार, 23 एप्रिल रोजी 2500, 24 एप्रिलला 100 रुपये, 25 एप्रिल रोजी 400 रुपये अशी घसरण झाली. दरम्यान, आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव हा 82,500 रुपये असा आहे.(Gold Silver Price 26 April 2024)
असा आहे 14 ते 24 कॅरेटचा भाव
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, सोने आणि चांदीत घसरण झाली.
24 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) – 71,805 रुपये,
23 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) – 71,805 रुपये,
22 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) – 66,038 रुपये,
18 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) – 54,071 रुपये,
14 कॅरेट (प्रति 10 ग्रॅम) – 42,175 रुपये असा आहे.
तर, एक किलो चांदीचा भाव हा 80,898 रुपये असा आहे. (Gold Silver Price 26 April 2024)
(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम