Gold Silver Price 21 May 2024 | चांदीची लाखाकडे कूच; असे आहेत आजचे सोने चांदीचे दर

0
38
Gold Silver Price 21 May 2024
Gold Silver Price 21 May 2024

Gold Silver Price 21 May 2024 |  गेल्या महिन्यात सोन्याने किंमतींची आघाडी कायम ठेवत दरवाढीचा विक्रम केला होता. तर, याही महिन्यात दोन्ही मौल्यवान धातूंनी दारवाढीचे सत्र कायम ठेवले होते. या महिन्याच्या सुरुवातीला धातूंचे दर कमी होते. मात्र, अक्षय तृतीयेनंतर पुन्हा दरवाढीच सत्र सुरू झाले.

यावर्षी २१ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचे भाव हे ६३,२०० रुपये असे होते. तर, तर एक किलो चांदीचा दर हा ७५,५०० रुपये असा होता. तर, आता सोन्याचे दर हे ७५ हजारांच्या घरात पोहोचले आहेत. दरम्यान, आज असे आहेत सोने आणि चांदीचे दर (Gold Silver Price 21 May 2024)

Gold Silver Price 21 May 2024 | सोने वाधारले 

गेल्या आठवड्यात एकूण सोन्याच्या किंमतींमध्ये दोन हजार रुपयांची वाढ झाली होती. तर, ७७० रुपयांची घसरण झाली होती. या आठवड्यात सुरुवातीलाही सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. सोने ५०० रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आज २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोनेच्या किंमती या ७५,३१० रुपये अशा आहेत. तर, २२ कॅरेट सोन्याचे दर हे ६९,०५० रुपये असे आहेत. (Gold Silver Price 21 May 2024)

Gold Silver Price 16 May 2024 | सोने चांदीतील घसरण थांबली; आज असे आहेत दर

चांदी लाखाच्या घरात 

सोन्यापेक्षा यंदा चांदीने ग्राहकांना मोठं धक्क दिला आहे. यावर्षीच्या सुरुवातीला २१ जानेवारी रोजी एक किलो चांदीचा भाव हा ७५,५०० प्रति किलो असा होता. तोच भाव आता जवळपास लाखांच्या घरात पोहोचला आहे. गेल्या आठवड्यात चांदीत जवळपास ७,००० रुपयांची वाढ झाली. तर ५०० रुपयांची घसरण झाली. १८ मे रोजी किंमती ३,९०० रुपयांनी, २० मे रोजी ३,५०० रुपयांनी चांदी महागली. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव हा ९६,५०० रुपये असा आहे.

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७३,३८३ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७३,०८९ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६७,२१९ रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५५,०३७ रुपये,

१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,९२९ रुपये असा आहे.

तर, एक किलो चांदीचा भाव हा ८६,३७३ रुपये असा आहे. (Gold Silver Price 21 May 2024)

(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)

Gold Silver Price 15 May 2024 | सोने चांदीत घसरण कायम; असे आहेत आजचे दर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here