Gold-Silver Price | सोने खरेदीची हीच उत्तम संधी; असे आहेत आजचे दर

0
61
Gold Silver Price 28 May 2024
Gold Silver Price 28 May 2024

Gold-Silver Price |   गेल्या दसरा-दिवाळीपासूनच सोने-चांदीच्या किंमतींनी उच्चनकी दर गाठले होते. आणि त्यानंतर ह्या महिन्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या दारांनी आधीचए सर्व विक्रम मोडीत काढत सलग नवे विक्रम रचलेत. दरम्यान, ऐन लग्नसराईत सोन्याच्या किंमती इतक्या वाढल्याचे वधू पित्यांची चिंता वाढली होती. अनेक लोक सोन्याच्या किंमती खाली यावेत याची वाट बघत होते.(Gold-Silver Price)

दरम्यान, मागील आठवड्यात सोन्याच्या किंमती सुरुवातीला काही प्रमाणात कमी झाल्या होत्या. त्यावेळी सोन्याच्या दरांमध्ये किंचित घसरण आढळून आली. पण नंतर गुरुवार पासून पुन्हा दरवाढ झाली. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून दरांमध्ये घसरण होऊन दर हे काही प्रमाणात स्थिर असल्याचे दिसत आहे. आज देखील सोन्याच्या दरांमध्ये किंचित वाढ झालेली असली, तरी किंमती ह्या स्थिर आहेत.

Gold Silver Rate | सोने- चांदी खरेदीचा हाच ‘गोल्डन चान्स’

असे आहेत आजचे दर..? 

दरम्यान, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे आज रुपये ६२,१९० असे आहेत. तर, गेल्या ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ही ६२,१८० रुपये प्रति तोळा वर ​​बंद झाली होती. बुलियन मार्केट या वेबसाइटनुसार, चांदीचे दर हे आज ७४,३७० रुपये प्रति किलो असे आहेत. मात्र, मागील ट्रेडमध्ये ह्या चांदीची किंमत ही ७४,३६० रुपये प्रतिकिलो इतकी होती. उत्पादन शुल्क, राज्य कर तसेच मेकिंग शुल्कामुळे सोन्या-चांदीच्या दागिन्यांच्या किमती देशभरात बदलत असतात.(Gold-Silver Price)

Gold Silver Rate | सोने-चांदीची मोठी मुसंडी; ग्राहकांचा हिरमोड

कोठे कसे आहेत दर..? |(Gold-Silver Price)

राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोने-चांदीचे दर हे पुढील प्रमाणे आहेत. बुलियन मार्केट ह्या वेबसाईटनुसार, देशाची आर्थिक राजधानी म्हणजेच मुंबईत आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ५६,८९८ रुपये असे आहेत. तसेच, मुंबईत २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ही आज ६२,०७० रुपये इतकी असून, पुण्यात २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा आजचा दर ५६,८९८ रुपये असा असेल तर, २४ कॅरेट सोन्याचा दर हा ६२,०७० रुपये इतका असेल.

उपराजधानी म्हणजेच नागपूर मध्ये आज २२ कॅरेट प्रति तोळा सोन्याची किंमत ही ५६,८९८ रुपये इतकी आहे. तसेच, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा आज ६२,०७० रुपये असा आहे. दरम्यान, नाशिकमध्ये २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर हा आज ५६,८९८ असा असून, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा आजचा दर हा ६२,०७० रुपये असा आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here