Gold Silver Price 16 May 2024 | सोने चांदीतील घसरण थांबली; आज असे आहेत दर

0
42
Gold Silver Price 30 May 2024
Gold Silver Price 30 May 2024

Gold Silver Price 16 May 2024 |  मागील महिन्यापासून सोने-चांदीचे दर तेजीत आहेत. त्यामुळे सोने चांदी सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्याचे दिसत होते. मात्र, या आठवड्यात सोने चांदीच्या भावात काहिशी नरमाई दिसून आली. आज सोन्याच्या दरात वाढ झाली असून, किंमतींच्या घसरणीला ब्रेक लागला आहे. तर, दुसरीकडे चांदीतही दरवाढ सुरू असून, अजूनही या दोन्ही धातुंच्या किंमतीत चढउताराचे सत्र कायम आहे. दरम्यान, आज असे आहेत सोने चांदीचे दर…(Gold Silver Price 16 May 2024)

सोन्यात दरवाढ 

गेल्या महिन्यात सोन्याने दरवाढीचा रेकॉर्ड केला होता. या महिन्यात मात्र तेवढी काही दरवाढ झाली नाही. मात्र, चढउतार दिसून आली. गेल्या आठवड्यात १० मे रोजी सोन्याच्या किंमतींमध्ये काही प्रमाणात वाढ झाली असून, या आठवड्यात खरेदीदारांना काहीसा दिलासा मिळाला. १३ मे रोजी सोन्याचे दर १०० रुपयांनी, १४ मे रोजी किंमती ४००  रुपयांनी खाली आले. पण १५ मे रोजी त्यात तितकीच वाढही झाली. गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६७,३०० रुपये तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे  ७३,४०० रुपये असा आहे.(Gold Silver Price 16 May 2024)

Gold Silver Price 15 May 2024 | सोने चांदीत घसरण कायम; असे आहेत आजचे दर

Gold Silver Price 16 May 2024 | चांदीतही वाढ

अक्षय तृतीयेला म्हणजेच १० मे रोजी चांदीत मोठी दरवाढ झाली. मात्र, या आठवड्यात चांदीत नरमाई दिसून आली. १३ मे रोजी चांदीत ५०० रुपयांची घसरण झाली. तर, दुसऱ्या दिवशी १४ मे रोजी चांदीत ७०० रुपयांची वाढ झाली. १५ मे आणि १६ मे रोजी भाव ११०० रुपयांनी वाढले. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचे दर ८७,६०० रुपये असे आहेत.

Gold Silver Price 14 May 2024 | सोन्याची आनंदवार्ता, दर नरमले; असे आहेत सोने चांदीचे दर

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,९३४ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,६४२ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६६,८०८ रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५४,७०१ रुपये,

१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,६६६ रुपये असा आहे.

तर, एक किलो चांदीचा भाव हा ८४,५०५० रुपये असा आहे. (Gold Silver Price 16 May 2024)

(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here