Gold Silver Price 15 May 2024 | सोने चांदीत घसरण कायम; असे आहेत आजचे दर

0
34
Gold Silver Price 28 May 2024
Gold Silver Price 28 May 2024

Gold Silver Price 15 May 2024 | गेल्या महिन्यापासून सोने चांदी चांगलेच तेजीत होते. मात्र, या महिन्यात दर काहीसे नरमताना दिसले. मे महिन्यात अजून तरी सोने आणि चांदीत हवी तशी दरवाढ झालेली नाही. मात्र, हेच मागील दोन महिन्यांत या दोन्ही धातूंनी दरवाढीचा कहरच केला होता. यामुळे आता सोने चांदी लाखाचा टप्पा गाठता की काय..? अशी भीती व्यक्त केली जात होती.

मार्च आणि एप्रिल महिन्यात झालेल्या या दरवाढीने रेकॉर्डच तयार केला आहे. मात्र, अक्षय तृतीयानंतर सोने चांदीत काहीशी घसरण पहायला मिळाली होती. मात्र, आता चांदीने नरमाईनंतर पुन्हा उसळी घेतली आहे. आज असा आहे सोने चांदीचा भाव…(Gold Silver Price 15 May 2024 )

सोन्याच्या किंमतीत घसरण 

मागील आठवड्यात सोन्याच्या किंमतीत २,०५० रुपयांची वाढ झाली होती. मात्र, या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याने ग्राहकांना दिलासा दिला होता. तर, १३ मे रोजी सोने १०० रुपयांनी, १४ मे रोजी ४०० रुपयांनी घसरण झाले. आजही सकाळच्या सत्रात सोन्यात घसरण दिसून येत आहे. मात्र, दुपारनंतर खऱ्या किंमती समोर येतील. गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याच्या किंमती ६६,९०० रुपये आणि २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचा भाव हा ७२,९७० रुपये असा आहे.(Gold Silver Price 15 May 2024 )

Gold Silver Price 14 May 2024 | सोन्याची आनंदवार्ता, दर नरमले; असे आहेत सोने चांदीचे दर

Gold Silver Price 15 May 2024 | चांदी स्वस्त 

मागील आठवड्यात चांदीत ४,७०० रुपयांची दरवाढ झाली होती. या आठवड्याची सुरुवात स्वस्ताईने झाली होती. १३ मे रोजी चांदीत ५०० रुपयांनी तर १४ मे रोजी ७०० रुपयांची दरवाढ झाली. दरम्यान आज गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव ८७,२०० रुपये इतका आहे.

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,३३५ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,०४५ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६६,२५९ रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५४,२५१ रुपये,

१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,३१६ रुपये असा आहे.

तर, एक किलो चांदीचा भाव हा ८७,२०० रुपये असा आहे. (Gold Silver Price 15 May 2024 )

(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)

Gold Silver Price 11 May 2024 | सोने-चांदीने केला हिरमोड; असे आहेत सोने चांदीचे दर


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here