Gold Silver Price 11 May 2024 | सोने-चांदीने केला हिरमोड; असे आहेत सोने चांदीचे दर

0
57
Gold Silver Price 21 May 2024
Gold Silver Price 21 May 2024

Gold Silver Price 11 May 2024 |  अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असतो. त्यामुळे ये दिवशी बहुतेक लोक सोने चांदीची खरेदी करतात. मात्र, यंदाची अक्षय तृतीया ही खरेदीदारांचा हिरमोड करणारी ठरली. ऐन सणासुदीत सोन्याच्या किंमती वाढल्याने ग्राहक निराश झाले.  या आठवड्यात सुरुवातीचे दोन दिवस सोने-चांदी तेजीत होते. मात्र, त्यानंतर दोन दिवस किंमती काहीशा कमी होताना दिसल्या. किंमती कमी झाल्याने ग्राहकांच्या आशा प्रज्वलित झाल्या. मात्र, ऐन अक्षय तृतीयेच्या दिवशी या दोन्ही मौल्यवान धातूंनी कहर केला. आज काय आहेत सोने चांदीचे दर चला बघूयात…(Gold Silver Price 11 May 2024)

सोन्याच्या दरांनी गाठला उच्चांक 

या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच सोन्याचे दर आघाडीवर होते. ६ मे रोजी सोने २०० रुपयांनी, ७ मे रोजी ३३० रुपयांनी महागले. तर, ८ आणि ९ मे रोजी किंमती १०० रुपयांनी खाली आल्या. तर, १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने १,५३० रुपयांनी महागले. गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ६७,७०० रुपये तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोन्याचे दर हे ७३,८४० रुपये असे आहेत. (Gold Silver Price 11 May 2024)

Akshaya Tritiya | अक्षय तृतीयेला सोने खरेदी करायचंय..?; जाणून घ्या सोने-चांदीचे दर

Gold Silver Price 11 May 2024 | चांदी आघाडीवर 

मागेले महिन्यात १७ एप्रिलपासूनच चांदी आघाडीवर आहे. तर, या आठवड्यात चांदीचे दर ४,७०० रुपयांनी वाढले. या आठवड्यात ६ मे रोजी १००० आणि ७ मे १००० रुपयांनी चांदी महागली. तर, ९ मे रोजी २०० रुपयांनी १० मे रोजी चांदी  २.५०० रुपयांनी वधारली. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा दर हा ८४,२१५ रुपये इतका आहे.

Gold Silver Price 26 April 2024 | सोने-चांदी स्वस्त; असे आहेत आजचे सोने-चांदीचे दर

असा आहे १४ ते २४ कॅरेटचा भाव 

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, असे आहेत प्रति कॅरेट सोन्याचे दर…

२४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७३,००८ रुपये,

२३ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ७२,७१६ रुपये,

२२ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ६६,८७५ रुपये,

१८ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ५४,७५६ रुपये,

१४ कॅरेट (प्रति १० ग्रॅम) – ४२,७१० रुपये असा आहे.

तर, एक किलो चांदीचा भाव हा ८४,२१५ रुपये असा आहे. (Gold Silver Price 11 May 2024)

(टीप – वरील दर हे सूचक असून, त्यात कुठल्याही करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी स्थानिक ज्वेलरसोबत संपर्क साधावा.)


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here