Gold Rate Today | या आठवड्यात सोने-चांदीने दरांमध्ये दमदार दरवाढ नोंदवली आहे. या आठवड्यात ह्या दोन्ही धातूंच्या दरांत घसरण झालेली नाही. मागील आठवड्यात सुरुवातीचव ३ दिवस सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण झाली. मात्र, या आठवड्यात दोन्ही धातूंनी आगेकूच कायम ठेवली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात असलेल्या मजबूत स्थितीमुळे सोने-चांदीचा भाव हा या आठवड्यात एक तर वाढत राहिला. या आठवड्यात सोन्यात ८८० रुपयांची आणि चांदीत २३०० रुपयांची दरवाढ नोंदवली गेली. दरम्यान, असे आहेत सोने-चांदीचे आजचे दर..?(Gold Rate Today)
सोन्याची आगेकूच
ह्या आठवड्यात सोने ८८० रुपयांनी महागळे आहे. मागील दोन्ही आठवड्यांच्या वधारलेलल्या किंमती बघता सोन्याच्या दरांमध्ये तब्बल २००० रुपयांची दर वाढ झालेली आहे. ह्या आठवड्यात १८ डिसेंबर रोजी सोन्याच्या दरांत १०० रुपयांनी वाढ झाली. त्यानंतर २० डिसेंबर रोजी सोन्याच्या किंमतीत ३८० रुपयांनी वाढ झाली. तर, २२ डिसेंबर रोजी किंमतींमध्ये २३० रुपयांची वाढ झाली. दरम्यान, काल सोन्याचे दर हे पुन्हा २५० रुपयांनी वाढले असून, गुडरिटर्न्सनुसार, आज २२ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ५८,३५० रुपये तर, २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम सोने हे ६३,६४० रुपयांवर पोहोचले आहे.(Gold Rate Today)
Gold News | महिलांनो! जास्त सोने खरेदी करू नका अन्यथा…
चांदीही झळाळली |(Gold Rate Today)
मागील आठवड्यात चांदीत ३५०० रुपयांची दरवाढ झाली होती. तर, ह्या आठवड्यात चांदीच्या दरांमध्ये तब्बल २३०० रुपयांनी वाढ झाली आहे. गेल्या दोन आठवड्यात एकूण ५८०० रुपयांची दरवाढ झाली आहे. ह्या आठवड्याच्या सुरुवातीला १८ डिसेंबर रोजी चांदीच्या किंमतींमध्ये ३०० रुपयांनी वाढ झाली. मात्र, त्यानंतर १९ डिसेंबर रोजी चांदीत ५०० रुपयांची घसरण झाली. २० डिसेंबर रोजी चांदीने १ हजार रुपयांनी पुन्हा वाढ झाली. त्यानंतर सलग अनुक्रमे ७००, ३००, रुपयांची चांदी वधारली. तर, काल चांदीत पुन्हा ५०० रुपयांची घसरण झाली. दरम्यान, गुडरिटर्न्सनुसार आज एक किलो चांदी ही ७९,००० रुपयांवर पोहोचली आहे.(Gold Rate Today)
Gold Silver Price | सोने-चांदीची आघाडी कायम; असे आहेत दर
असा आहे भाव..?
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, आज प्रति कॅरेट सोन्याचे दर हे पुढीलप्रमाणे आहेत…
२४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ६२,८८४ रुपये
२३ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ६२,५९२ रुपये
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ५७,५६५ रुपये
१८ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ४७,१३३ रुपये
१४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) – ३६,७६४ रुपयांवर पोहचले आहे.(Gold Rate Today)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम