Gold Silver Rate | धनत्रयोदशीला सोने-चांदी स्वस्त

0
18
Gold Rate
Gold Rate

Gold Silver Rate |  धनत्रयोदशीला सोने-चांदी खरेदी करणे हे शुभ मानले जाते. मागील आठवड्यापासून घसरणीचे सत्र या आठवड्याच्या शेवटच्या टप्प्यातही सुरुच आहे. भाव घसरल्याने आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला. आज सराफ बाजारात गर्दी उसळली आहे. आज धनत्रयोदशीला सोने-चांदीचे दागिने खरेदी करणाऱ्यांना स्वस्तात खरेदी करता येणार आहे. या आठवड्यात किंमतीत अशी घसरण झाली.

सोने इतक्या रुपयांनी स्वस्त

गेल्या दहा दिवसांत सोन्याने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. ३१ ऑक्टोबरपासून सोन्यात १,६५० रुपयांची घसरण आली. आणि मागील चार दिवसांचा विचार करता, सोन्यात ८८० रुपयांची घसरण झाली आहे. आता २२ कॅरेट सोने ५५,८५० रुपये प्रति १० ग्रॅम  असे सोन्याचे दर आहेत.

Nashik news | नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर होणार

चांदीत स्वस्ताई

ह्या आठवड्याच्या सुरुवातीलाच ६ नोव्हेंबर रोजी चांदी २०० रुपयांनी महागली. आणि ७ नोव्हेंबर रोजी किंमती ७००  रुपयांनी खाली आल्या. ८ नोव्हेंबर रोजी १००० रुपयांची घसरण झाली. तर ९ नोव्हेंबर रोजी किंमतीत ३०० रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आज एक किलो चांदीचा भाव ७३,२०० रुपये असा आहे.

किती कॅरेटचा कसा आहे भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोने ६०,०९७ रुपये,  २३ कॅरेट ५९,८५६ रुपये, २२ कॅरेट सोने ५५,०४९ रुपये असे झाले आहेत. १८ कॅरेट ४५,०७३ रुपये, १४ कॅरेट सोने ३५,१५७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे. चांदी घसरली असून, एक किलो चांदीचा भाव हा ७०,३०० रुपये इतका झाला आहे.

Nashik news | नाशिक मधील ४६ महसूल मंडळे दुष्काळी म्हणून घोषित


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here