Political News | ५०० रुपयांत घरगुती सिलिंडर द्या; अभिजित बिचुकलेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
13

Political News | छत्तीसगडमध्ये भाजपने पाचशे रुपयांत गॅस सिलिंडरची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवाळी आणि बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेम दाखवायचे असेल, तर त्यांनी १७ नोव्हेंबर ला बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी निमित्त पाचशे रुपयांत घरगुती गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करावी, अशी मागणी बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यायांना ऐन दिवाळीत हे पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, छत्तीसगड मधील जनतेला भाजपने ५०० रुपयांत गॅस सिलिंडर देण्याचे आश्वासन दिले आहे.

त्यानुसार महाराष्ट्रातही दिवाळीच्या आणि कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या पार्श्वभूमीवर १७ नोव्हेंबरला ५०० रुपयांत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करावी. दरम्यान, ही घोषणा करताना कै. बाळासाहेब ठाकरे ५०० रुपयांत गॅस सिलिंडर ही योजना सुरू करून कै. बाळासाहेब ठाकरे यांच्यावरील प्रेम दाखवावे, अशी मागणी बिचूकले यांनी या पत्रातून केली आहे.

Retro classic CB350; बुलेटसारखी Hondaची नवी गाडी बाजारात दाखल

बिचुकले पुढे म्हटले की, राज्यातील जनतेने २०१४ पासून भाजपला सत्तेत येण्यासाठी मतदान केले. आपण शिवसेना फोडून कै. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सत्तेत आज मुख्यमंत्री आहात. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला सत्ता दिल्याने आपण भाजपच्या माध्यमातून येथील जनतेला ताबडतोब ५०० रुपयांत गॅस सिलिंडर देण्याची घोषणा करावी. विशेष म्हणजे ५०० रुपयांमध्ये गॅस सिलिंडरच्या योजनेला तुमचे आदर्श ‘कै. बाळासाहेब ठाकरे ५०० रुपयांत गॅस सिलिंडर योजना’ असे नावही द्यावे.

राज्याच्या जनतेच्या वतीने मी ही विशेष सूचना करत आहे. तरी ही योजना तत्काळ मान्य करून तशी घोषणाही करावी. भाजपकडून जनतेला दिवाळीची ही भेट द्यावी, असेही बिचुकले यांनी या पत्र‍ात म्हटलं आहे.

crime news | फॅशनेबल बांगड्या घातल्या म्हणून पत्नीला अमानुषपणे मारहाण


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here