गिरणा नदीकाठावरील गावांचा वाळू उपशाला विरोध कायम ;आजच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत एकमुखी निर्णय

0
25
देवळा / विठेवाडीत शासनाच्या नविन वाळु निलाव धोरणाला एकमुखाने विरोध दर्शवतांना उपस्थित ग्रामस्थ तर दुसऱ्या छायाचित्रात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे ,उपविभागीय अधिकारी चंदशेखर देशमुख ,तहसीलदार विजय सूर्यवंशी ,सरपंच सतीश देशमुख , कुबेर जाधव आदी (छाया -सोमनाथ जगताप)

देवळा | सोमनाथ जगताप
शासनाच्या नवीन वाळु धोरणानुसार वाळु उपाशाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील विठेवाडी, भऊर, सावकी, खामखेडा व लोहोणेर या गांवातील ग्रामस्थांची भुमिका जाणुन घेण्यासाठी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांनी आज बुधवार( दि १०) रोजी विठेवाडी येथिल दत्त मंदिराच्या प्रांगणात बैठक आयोजित केली होती .

Nitish Kumar Mumbai Visit: उद्या मोठी राजकीय खळबळ, या राज्याचे मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार

देवळा विठेवाडीत शासनाच्या नविन वाळु निलाव धोरणाला एकमुखाने विरोध दर्शवतांना उपस्थित ग्रामस्थ तर दुसऱ्या छायाचित्रात ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना व्यासपीठावर अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे उपविभागीय अधिकारी चंदशेखर देशमुख तहसीलदार विजय सूर्यवंशी सरपंच सतीश देशमुख कुबेर जाधव आदी छाया सोमनाथ जगताप

या साठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे या उपस्थित होत्या, यावेळी श्रीमती पाटोळे यांनी शासनाने सर्वसामान्य जनतेला स्वस्तात वाळु उपलब्ध करून देण्यासाठी जेथे जेथे वाळुचे स्तोत्र उपलब्ध होतील त्याठिकाणी वाळु ठिय्याची निविदा काढून ती वाळु एका ठिकाणी जमा करून ती सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे, अशी भूमिका मांडली असता,तशा पद्धतीने वाळु उपसा करण्यास वरील सर्व गावकऱ्यांनी ग्राम सभेचा ठराव संमत करून एकमुखी विरोध दर्शविला . भउर विठे्वाडी ,सावकी, खामखेडा, लोहोणेर या पाच गावातील ग्रामस्थांनी वाळू उपशा विरोधात ठराव संमत करून शासनाच्या नवीन वाळु धोरणाचा निषेध नोंदवला .

यावेळी विठे्वाडी येथील प्रगतिशील शेतकरी दिनकर जाधव, शशिकांत निकम, पंडित निकम, भऊर येथील बाजार समितीचे माजी संचालक जगदीश पवार, लोहोणेरचे सरपंच सतिष देशमुख, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव, खामखेड्याचे माजी सरपंच पंढरीनाथ शेवाळे, गणेश शेवाळे, सावकीचे सरपंच कारभारी पवार, माणीक निकम,विनोद आहेर, आदींनी नविन वाळु धोरणाचा निषेध करत ठाम विरोध दर्शविला .

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी माया पाटोळे यांनी सांगितले की, आम्ही तुमचा विरोध समजु शकतो, नदी काठावरील जनतेला पिण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे, शेतकऱ्यांच्या जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध झाले तरच ते जगतील म्हणून तुमचा विरोध आहे. आपण सरकारच्या वाळु उपशाला विरोध दर्शवित आहात आणि दुसरीकडे रात्री बे रात्री उशिरापर्यंत अवैध वाळू उपसा सुरू असतो अशी माहिती समोर आली आहे. त्याला तुम्ही का पायबंद घालत नाही? तुम्ही आमच्या स्थानिक अधिकाऱ्यांना का पाठीशी घालता? असा सवाल उपस्थित केला असता लोहोणेर येथील सरपंच सतिष देशमुख यांनी आम्ही अवैध वाळू उपसा संदर्भात अनेक वेळा शासकिय अधिकाऱ्यांना फोन करून मुद्देमाल पकडून देतो परंतु ठराविक कालावधीनंतर ते मोकळे होतात, असे जप्त करण्यात आलेली वाहने सडेपर्यंत सोडु नये, ती जागेवरच सडु द्यावी, अशी भुमिका मांडली, या पाचही गावांतील ग्रामस्थांनी शासनाच्या नवीन वाळु धोरणाचा निषेधाचा सर्वानुमते यावेळी ठराव संमत करून शासनाकडे सुपूर्द केला.

यावेळी उपविभागीय अधिकारी चंद्रशेखर देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीला तहसिलदार विजय सुर्यवंशी आदींसह भउर येथिल सरपंच दादा मोरे, काशिनाथ पवार, पांडुरंग पवार, मिलिंद पवार, बाजार समिती संचालक अभिमन पवार, भाऊसाहेब पवार, सुभाष पवार, विठेवाडी येथिल सरपंच भाऊसाहेब पवार, विठोबा सोनवणे, भास्कर निकम, पंडित निकम, राजेंद्र निकम,विलास निकम, महेंद्र आहेर, संजय सावळे , अभिजित निकम,धना निकम, रावसाहेब निकम,काकाजी निकम,खामखेडा सरपंच वैभव पवार, रविंद्र शेवाळे, संजय सावळे, प्रविण निकम, ललित निकम, श्रावण बोरसे, दिपक निकम, बाळासाहेब सोनवणे, नंदकिशोर निकम,दादाजी सोनवणे,लक्ष्मण निकम,अमर जाधव, रविंद्र कापडणीस, अशोक आहेर,वंसत निकम, बाळासाहेब निकम , भैय्या निकम ,काशिनाथ बोरसे,जिभाउ बोरसे ,सावकीचे दिलीप पाटील, शेखर बोरसे, धनंजय बोरसे आदीसह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते . प्रास्ताविक स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव यांनी केले तर आभार शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुनिल पवार यांनी मानले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here