Gas Price: केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅस सिलेंडरचे दर पुन्हा घसरले

0
63

Gas Price (नवी दिल्ली) : केंद्र सरकारने आज पुन्हा एकदा गॅस सिलेंडरबाबत मोठा निर्णय घेतललेला आहे. गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा घसरण करण्यात आलेली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब, होतकरु आणि सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिलेला आहे.पं.नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण केलेली आहे. यावेळी मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेचा फायदा उज्ज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना होईल. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेत याबाबतची घोषणा केली. त्यामुळे आता उज्ज्वला योजनेतील 10 कोटी ग्राहकांना आणखी मोठा दिलासा मिळणार आहे.(Gas Price)

Election | ग्रामपंचायत निवडणुकीचा उडणार धुरळा, मतदानाची तारीख जाहीर

केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा एकदा वाढ केली आहे. याआधी केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना 200 रुपये सबसिडी दिली जात होती. आता यात आणखी 100 रुपयांची सबसिडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील नागरिकांना आता फक्त 600 रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकारने याआधी 37 दिवसांपूर्वीच याबाबतची मोठी घोषणा केलेली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारने निर्णय घेत सर्वसामान्य महिलांना दिलासा दिला आहे.

आता 100 रुपयांची सबसिडीत वाढ –
केंद्र सरकारने याआधी 29 ऑगस्टला  याबाबत महत्त्वाची घोषणा केली होती. त्यावेळी सरकारने घरगुती गॅस सिलेंडरचे दर 200 रुपयांनी कमी केले होते. ही घोषणा देशभरातील प्रत्येक नागरिकांसाठी करण्यात आली होती. तसेच उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी 200 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी गॅस सिलेंडरचे दर तब्बल 400 रुपयांनी स्वस्त केले होते. त्यानंतर आता याबाबत आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेतील ग्राहकांसाठी 200 ऐवजी 300 रुपये सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.

Breaking News |राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर

सप्टेंबर महिन्यात मोदी सरकारने घेतला होता मोठा निर्णय-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची सप्टेंबर महिन्यात बैठक पार पडली होती. त्यावेळी याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला होता. मोदी सरकारने उज्ज्वला योजनेतुन 75 लाख अतिरिक्त एलपीजी कनेक्शन देण्यास मंजुरी दिली होती. तीन वर्षांसाठी केलं जाणाऱ्या या अतिरिक्त एलपीजी कनेक्शनचा 1650 कोटी रुपयांचा वित्तीय भार सरकारच्या तिजोरीवर पडणार आहे, असं अनुराग ठाकूर यांनी सांगितलं होतं.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here