नाशिक: महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो. त्या पार्श्वभमीवर आज नाशिक येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न झाली. नाशिक शहरातील उत्सव हा आगळावेगळा आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडेल असा विश्र्वास पालकमंत्री भुसे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री महोदयांनी ज्या सूचना केल्या आहेत त्यांची अमलबजावणी प्रभावीपणे होईल अशी माहिती भुसे यांनी दिली. यावेळी शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.
भुसे पुढे म्हणाले की जे मंडळ चांगले कार्य करत आहेत त्यांना पाच लाख रुपये शासनातर्फे देण्यात येणार आहे, त्यात जिल्हा नियोजन मधून बाकी निधी समाविष्ट करून एकूण 11 लाख रुपये देणार असल्याची घोषणा यावेळी भुसे यांनी केली. गणेशोत्सवाच्या पार्श्भूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याचे दृष्टीने पोलीस विभागाने पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना केल्यात तसेच गणपती उत्सवासाठी मंडळातर्फे उभारण्यात आलेले मंडपाने रहदारीस व वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही, याची काळजी घेण्याची विनंती यावेळी मंडळांना केली. गणपती बाप्पा आगमन व विसर्जन मिरणूकीतील मार्गातील अडथळे रस्त्यांवरील खड्डे तातडीने बुजविण्याच्या सूचना केल्या आहेत. आरोग्याच्या बाबत काळजी घेण्याच्या सूचना देखील केली आहे.
मंडळांच्या मागणीनुसार गणपती उत्सव कालावधी विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही, याची संबंधित विभागाने दक्षता घेण्याची सूचना केली आहे. विसर्जन मिरणूकीच्यावेळी सर्व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सुसज्ज स्थितीत विसर्जन स्थळी उपलब्ध ठेवावी. तसेच विसर्जन स्थळी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना उदभवणार नाही, याबाबत सर्व विभागांनी विशेष काळजी घेऊन उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभागांना केल्या आहेत.
बैठकीसाठी नाशिक शहरातील गणपती मंडळांचे पदाधिकारी, नाशिक शहर पोलिस आयुक्त , मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, महापालिका आयुक्त, नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, मुख्य अभियंता विद्युत वितरण कंपनी तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम