Gangapur Dam | राज्यभरात सध्या तापमानवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तर, दुसरीकडे बहूतेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या उद्भवू लागली आहे. दरम्यान, नाशिक शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणाचा पाणीसाठाही कमी झाला आहे. गंगापूर धरणात (Gangapur Dam) सध्या केवळ २५ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक असून, त्यामुळे आता नाशिककरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. गंगापूर धरणातील पाणीसाठा कमी झाला असून, त्यामुळे आता नाशिकमध्ये पाणीकपातीबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
Gangapur Dam | शनिवारी पाणी पुरवठा बंद
पुरवठा वाहिन्यांची दुरुस्ती, व्हॉल बदलणे, व्हॉलची दुरुस्ती इत्यादि कामे असल्याने शनिवारी २५ मे रोजी नाशिक शहरात महापालिका हद्दीत पाणी पुरवठा बंद असणार आहे आणि रविवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तरी, नाशिक मनपाकडून नाशिककरांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (Gangapur Dam)
Water reduction | नाशिककरांनो पाणी जपुन वापरा! डिसेंबरमध्येच राज्यात उरला ६४ टक्केच पाणीसाठा
१,२२० गाववाड्यांना टँकरने पाणीपुरवठा
दरम्यान, नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईची परिस्थिती भीषण असून, अनेक खेडोपाडी टँकरने पाणीपुरवठा केला जाण्याची शक्यता आहे. ३४८ गावे आणि ८७२ वाड्या अशा एकूण १,२२० गाववाड्यांना ३७० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. (Gangapur Dam)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम