Malegaon | अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत आणखी वाढ

0
17
Advay Hiray
Advay Hiray

Malegaon |  मालेगाव येथील रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी संस्थेसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून घेतलेल्या ७ कोटी ४६ लाखाच्या कर्ज रकमेत घोटाळा केल्याप्रकरणी उद्धव ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, अटकेत असलेले अद्वय हिरे यांच्या पोलीस कोठडीत आता वाढ झाली आहे.

न्यायालयाने याआधी त्यांना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावलेली होती. दरम्यान, ह्या सोमवारी या कोठडीची मुदत संपल्यामुळे त्यांना न्यायालयात हजार केले असता, हीरे यांच्या पोलीस कोठडीत पुन्हा तीन दिवसांची वाढ करण्यात आलेली आहे.

हिरे यांच्याशी संबंधित रेणुकादेवी औद्योगिक यंत्रमाग सहकारी या संस्थेसाठी हिरे यांनी १० वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी या बँकेकडून सात कोटी ४६ लाखाचे कर्ज घेतलेले होते.

Gold-Silver Price | २४ तासांत सोन्याची पुन्हा उसळी, चांदीही सरसावली

या कर्ज प्रकरणी बँकेची फसवणूक झाल्यामुळे मालेगाव येथील रमजानपुरा पोलीस ठाण्यात संबंधित २७ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी, बुधवारी अद्वय हिरे यांना अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना २० नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, सोमवार (दि. २०) रोजी पोलिसांनी दुसऱ्यांदा अद्वय हिरे यांना न्यायालयात हजार केले होते. या गुन्ह्याच्या तपासकामी पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याचा युक्तिवाद सरकारी पक्षातर्फे करण्यात आला होता.
त्यानुसार जिल्हा व अप्पर सत्र न्यायाधीश एस. बी. बहाळकर यांनी २३ नोव्हेंबरपर्यंत अद्वय हिरे यांची पोलीस कोठडी वाढवली आहे. यावेळी हिरे यांच्या समर्थकांची न्यायालयाच्या परिसरात मोठी गर्दी जमली होती.

author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here