Gold Silver Price | सोन्याच्या दरांत आणखी घसरण.. असा आहे आजचा दर

0
39

Gold Silver Price | ऐन धनत्रयोदशीपूर्वी सोने चांदीच्या किंमतींत घसरणीचे सत्र सुरू आहे. अशा परिस्थितीत मौल्यवान धातू स्वस्त दरात खरेदी करण्याची ही उत्तम संधी ग्राहकांना मिळणार आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने-चांदी खरेदी करणे हे शुभ मानले जाते. दरम्यान, ऐन धनत्रयोदशीच्या तोंडावर सोन्याच्या दरांत पुन्हा घसरण बघायला मिळत आहे. 

असा आहे सोने-चांदीचा भाव
सोन्याच्या किंमतीत आज नरमाई आहे. जागतिक बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण झाली आहे.   गुडरिटर्न्सनुसार, आज सोने आणि चांदीच्या किंमती या कमी झाल्या आहेत.आज मुंबई मध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर हा ५६,२५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २४ कॅरेट सोन्याचा दर हा ६१,३६० रुपये प्रति १० ग्रॅम असा आहे.

तसेच चांदीचा दर ७४,५०० रुपये प्रति किलो असा आहे. सलग दोन दिवस ह्या धातूंमध्ये घसरण सुरू होती. यानंतर आज भारतीय बाजारांत मौल्यवान धातूंचे कल हे संमिश्र दिसून आले. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याच्या वाढीसह व्यवहार सुरू झाला, दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी चांदीच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली.
ह्या शहरात असे आहेत दर
बुलियन मार्केटनुसार, मुंबईत २२ कॅरेट सोन्याचे दर हे प्रति १० ग्रॅम ५५,४४० रुपये असे आहे. तसेच २४ कॅरेट सोन्याचे दर हे ६०,४८० प्रति १० ग्रॅम असे आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ५५,४४० आहे तर, २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,४८० रुपये आहे. नगपूरमध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत ही ५५,४४० तर २४ कॅरेट सोन्याची किंमत ही ६०,४८० रुपये इतकी असेल. नाशिकमध्ये २२ कॅरेट सोन्याचा दर ५५,४४० प्रति १० ग्रॅम तर,  २४ कॅरेट सोन्याचा दर ६०,४८० रुपये असा आहे.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here