माजी कर्णधार सुनील गावस्करांचा क्रिकेट संघाला गंभीर इशारा !

0
21

द पॉइंट नाउ प्रतिनिधी : भारतीय क्रिकेट संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला असला तरी देखील माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्करांकडून एक गंभीर इशारा टीम इंडियाला देण्यात आला आहे. भारताकडून आतापर्यंत कोणती एकच चूक सतत घडत आहे, हे त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले आहे.

गावस्कर असे म्हणाले की, “सूर्याकुमार यादव हा सध्याचा घडीस भन्नाट फॉर्ममध्ये  आहे, त्याबरोबरच तो मैदानात ३६० डीग्रीमध्ये सर्व प्रकारे फलंदाजी करतो.  तो आता भारताला दमदार धावसंख्येपर्यंत नेणारा खेळाडू बनत आहे. भारताने झिबाब्वेविरुद्धच्या सामन्यात ज्या धावा केल्या त्या मेलबर्नमधील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च असणाऱ्या धावसंख्या आहेत. सूर्यकुमारकडून जर नाबाद राहून ६१ धावा झाल्या नसत्या तर भारत १५० धावांपर्यंत पोहोचू शकला नसता.”

गावस्कर पुढे म्हणाले की, “जर सूर्यकुमार अपयशी ठरला तर भारताला १४०-१५० धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागेल, त्यामुळे लोकेश राहुल याने अधिक जबाबदारी स्वीकारणे महत्वाचे आहे. कर्णधार रोहित शर्मा देखील फॉर्मसाठी झगडत असून त्याने पाच सामन्यांमध्ये फक्त ८९ धावा केल्या आहेत. नेदरलँड्सविरुद्धच्या ५३ धावांच्या खेळीचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे ही खेळी  सोडल्यास रोहितलाही मोठी खेळी साकरता आली नाही. त्यामुळे भारताकडून सातत्याने ही चूक घडत आहे आणि ही चूक भारतीय संघाने लवकरात लवकर सुधारणे गरजेचे आहे अथवा त्यांच्यासाठी हे धोक्याचे ठरू शकते.”

भारतीय संघाने आतापर्यंतच्या विश्वचषकात एकूण चार सामने जिंकले आहेत, तर एक सामन्यामध्ये त्यांंना पराभव स्वीकारावा लागला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील हा पराभव त्यांना फलंदाजीमुळेच पत्करावा लागला. भारताचे फलंदाज एकामागून एक बाद झाले. त्या सामन्यामध्ये सूर्याने अर्धशतक पूर्ण केले होते. पण बाकीच्या फलंदाजांची त्याला चांगली साथ मिळाली नव्हती. त्यामुळेच भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नव्हती. त्यामुळे आता भारतीय संघ सेमी फायनलमध्ये किती धावा करतो आहे, याकडे सर्वांचे लक्ष असेल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here