Gold Silver Rate | मागील आठवड्यात सोने-चांदीने जोरदार मुसंडी घेतली. किंमती वाढल्याने ग्राहकांना त्याचा फटका बसला. दरम्यान, आता या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती ह्या थोड्या घसरल्या. मात्र, मंगळवारी सोने-चांदीत पुन्हा जोरदार वाढ झाली. २४ कॅरेट सोन्यासाठी आता तब्बल ६२ हजार मोजावे लागणार आहे. तर चांदीनेही मोठी उडी घेतली आहे.
सोने झळाळले
या आठवड्यात २० नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरांत ५० रुपयांची घसरण झाली आहे. २१ नोव्हेंबर रोजी दर ३८० रुपयांनी वाढले आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ५७,००० रुपये तर २४ कॅरेट प्रति १० ग्रॅम इतक्या सोन्याचे दर हे ६२,१७० रुपये असे आहेत.
Breaking news | अंकुश शिंदेंची तडकाफडकी बदली; संदीप कर्णिक नाशिकचे नवे पोलिस आयुक्त
चांदी झाली महाग
मागील आठवड्यात चांदी ४,१०० रुपयांनी वाढली होती. दरम्यान, आता या आठवड्याच्या सुरुवातीला ह्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. पण २१ नोव्हेंबर रोजी किंमती ४०० रुपयांनी वाढल्या आहेत. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा दर हा ७६,४०० रुपये असा आहे.
१४ ते २४ कॅरेटचे असे आहेत दर
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार, २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ६१,२५० रुपये तर, २३ कॅरेट प्रति १० ग्रॅम ६१,००५ रुपये असे आहेत. २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ५६,१०५ रुपये असे झाले आहेत तर १८ कॅरेट ४५,९३८ रुपये असे आहेत. दरम्यान, १४ कॅरेट सोने ३५,८३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहचले आहे.
दरम्यान, एक किलो चांदीचे दर हे ७२,७२९ रुपये असे झाले आहेत.
(वायदे बाजारात व आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीवर कुठलाही कर नसतो. तर सराफा बाजारात शुल्क व कराचा समावेश होतो. त्यामुळे दरांत तफावत दिसून येते.)
Info-tech news | फोनपेक्षाही स्वस्त किंमतीत जिओचा नवा लॅपटॉप
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम